– काँग्रेसला स्वतःच्या फायद्यासाठी देशाचे तुकडे करायचे आहेत.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मंडीतील भाजप खासदार कंगना रणौत (Kangana Ranaut )यांनी राहुल गांधी यांच्यावर आज विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी ( Rahul Gandhis )यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. राहुल गांधींच्या बोलण्यात काही अर्थ नाही. ते अर्थहीन बोलतात, असं त्यांनी म्हटलं आहे.
आज सभागृहाच्या कामकाजात जाण्यापूर्वी कंगना म्हणाल्या, राहुल गांधीबद्दल काय बोलू? त्यांच्या बोलण्यात काही अर्थ नाही, निदान ते काय बोलतात हे मला तरी समजत नाही. त्यांच्याबद्दल सर्वात निंदनीय बाब म्हणजे ते देशासाठी चुकीचे शब्द वापरतात. हे देशासाठी चांगले नाही.
स्वतःच्या फायद्यासाठी देशाचे तुकडे करण्याची काँग्रेसची मानसिकता आहे, असे अनुराग ठाकूर म्हणाले, ते अगदी योग्य असल्याचे कंगना म्हणाल्या आहेत. शिवाय, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळापासून ही गोष्ट सुरू आहे, असंही कंगना रणौत म्हणाल्या आहेत.
कंगना रणौत यांनी हिमाचलमधील मंडी येथे ढगफुटीमुळे झालेल्या विनाशावर दु:ख व्यक्त केले. त्या म्हणाले की, डोंगरात राहणाऱ्या लोकांचे जीवन कठीण आहे. दरवर्षी अशा दुर्घटना घडतात आणि त्यामुळे हिमाचल प्रदेशातील लोकांचे जीवित आणि मालमत्तेचे नुकसान होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more