विशेष प्रतिनिधी
नगर : शरद पवारांनी निर्माण केलेल्या राष्ट्रवादी नावाच्या प्रवृत्तीला “भावी मुख्यमंत्री” पदाची लागण झाली आहे. या लागणीतूनच पवारांचे नातू आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवारांचे नाव भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर्स लिहिले. ती पोस्टर्स कार्यकर्त्यांनी मोठमोठ्या महामार्गावर झळकवली. आता पोस्टरवचे भावी मुख्यमंत्री “खाली” आले, पण स्वतःच्याच मंत्रिपदाची घोषणा करून बसले!!
त्याचे झाले असे :
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मेळावा नगर जिल्ह्यात झाला. त्यात खासदार निलेश लंके आणि आमदार रोहित पवारांची भाषणे झाली. पवारांच्या नादी लागून स्वतःचे नुकसान करून घेऊ नका, अशी दमबाजी खासदार लंके यांनी आमदार राम शिंदे यांना केली.
पण रोहित पवार त्या दमबाजी पलिकडे गेले. ते स्वतःच्या मंत्रिपदाची घोषणा करून बसले. कर्जत जामखेडचा एमआयडीसी प्रस्ताव असो की अन्य काही विकासकामे असोत, सध्याचे मंत्री त्यांच्या कागदांवर सह्या करणार नसतील, तर पुढच्या तीन महिन्यांनंतर आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना जनतेच्या आशीर्वादाने आणि शरद पवारांच्या ताकदीने त्या कागदावर सह्या करण्याची संधी मिळेल, असे सांगत रोहित पवारांनी स्वतःच्या मंत्रिपदाची परस्पर घोषणा करून टाकली.
रोहित पवारांच्या कर्जत जामखेड मतदारसंघातून पहिल्या टर्मचे आमदार आहेत. पण आता महाविकास आघाडीतल्या जागावाटपात काँग्रेसने या मतदारसंघावर दावा ठोकला आहे. त्यामुळे रोहित पवार कर्जत जामखेड मधून आमदार होणार की त्यांना बारामतीचा रस्ता पकडावा लागणार??, याची शाश्वती नाही. पण पोस्टरवरच्या या भावी मुख्यमंत्र्यांना ते पद मिळाले नाही तर निदान मंत्रिपद मिळायची आस लागून राहिली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more