वृत्तसंस्था
पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या हॉकी संघानं पेनल्टी शुट आऊटमध्ये ब्रिटनला उपांत्यपूर्व पराभूत केले आणि ऑलिंपिक पदकाच्या आशा उंचावल्या आहेत.
भारत विरुद्ध ब्रिटन हा अत्यंत चुरशीचा सामना पेनल्टी शुट आऊटमध्ये पोहोचला, तेव्हा सगळ्यांचे टेन्शन वाढले होते. पण भारतीय टीमने जबरदस्त खेळ करत ब्रिटनला 4-2 अशा फरकानं पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. निर्धारित वेळेत दोन्ही संघांनी 1-1 अशी बरोबरी केल्यानं मॅचचा निकाल पेनल्टी शुट आऊटद्वारे लावण्यात आला. भारताचा गोलकीपर श्रीजेश यानं जोरदार बचाव केल्यानं आणि भारताच्या हॉकी खेळाडूंनी पेनल्टी शुट आऊटमध्ये 4 गोलं केल्यानं ब्रिटनला पराभवाचा धक्का बसला. भारताची उपांत्य फेरीतील लढत आता 6 ऑगस्ट रोजी होणार आहे.
मनू भाकर आणि स्वप्नील कुसाळे यांनी आधीच भारताला शूटिंगमध्ये 3 ब्राँझ पदके मिळवून दिली आहेत. आता हॉकीत देखील पदकाची आशा उंचावली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more