विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : पाणी संपताच नष्ट होणारी बाटली


बाटलीबंद पाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस प्रचंड वाढत आहे. अशा वेळी यातून पर्यावरणाचे नवीन प्रश्न निर्माण होवू लागले आहे. प्लास्टिक नष्ट होण्यासाठी, त्याचे विघटन होण्यासाठी किमान साडेचारशे ते हजारो वर्षे लागतात. त्या तुलनेत प्लास्टिकची निर्मिती मात्र थक्क करणार्याा वेगाने होत आहे. त्यामुळे त्यावर उपाय शोधण्यासाठी जगभर संशोधकांचे अथक प्रयत्न सुरु आहेत. त्यात आता यश आले आहे.Wow, the bottle will disappear automatically when the water runs out

पाणी प्यायल्यानंतर बाटली आपोआप नष्ट होईल, अशा बाटल्या विकसित करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. आईसलॅड ऍकाडमी ऑफ आर्ट्समध्ये प्रॉडक्ट डिझाईन ऍण्ड आर्किटेक्चर शिकणार्याआ ऍरी जॉन्सन या विद्यार्थ्याने अशाप्रकारची एक अभिनव बाटली विकसित केली आहे. या बाटलीतील पाणी संपले की ती आपोआपच नष्ट होते.

शेवाळापासून बनणार्याे पावडरपासून बनवण्यात आलेली ही बाटली असून ही पावडर पाण्याच्या संपर्कात आली की एक प्रकारची जेली तयार होते. त्यापासूनच ही बाटली बनवण्यात आली आहे. या बाटलीतील पाणी संपले की बाटली आपोआप आकुंचन पावते आणि नष्ट होते. प्लास्टिकचा अनिर्बंध वापर हा शास्त्रज्ञ आणि पर्यावरण तज्ज्ञांसाठी मोठा काळजीचा विषय आहे. पण त्यावर काही प्रमाणात का होईना मात करणे आता शक्य होणार आहे.

विशिष्ट प्रकारच्या शेवाळापासून बनवलेली पावडर पुन्हा पाण्याच्या संपर्कात आली तर जेलीसारखी बनते आणि त्याला हवा तो आकार देता येतो, हे त्याला समजले. त्यानंतर त्याने या जेलीला पिण्याच्या पाण्याच्या बाटलीसारखा आकार दिला. हे सर्व करताना जेली पाण्याबाहेर येणार नाही, हे पाहिले. म्हणजेच ही शेवाळापासून बनलेली जेली पाण्याबाहेर आली की सुकते. त्यानंतर पुन्हा त्याची पावडर होते. शेवाळ हे पूर्णपणे सेंद्रीय म्हणजे नैसर्गिक आणि डिस्पोजेबल असल्यामुळेच त्याने यावर प्रयोग केले. त्यातून हा अनोखा शोध लागला आहे.

Wow, the bottle will disappear automatically when the water runs out

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात