वृत्तसंस्था
मेवाड (राजस्थान) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी भारतीय राजकारणावर अत्यंत महत्त्वाचे विधान केले आहे. मॉब लिंचिंग करणे हे हिंदुत्व नाही. ते करण्या जे अडकलेत ते हिंदुत्वाचे अनुसरण करीत नाहीत, असे परखड बोल त्यांनी ऐकविले आहेत. त्याच बरोबर मॉब लिंचिंगच्या अनेक केसेस खोट्या दाखल केल्याचा दाखलाही सरसंघचालकांनी दिला आहे. Those who are indulging in lynching are against Hindutva, the RSS chief said but he also mentioned that sometimes some false cases of lynching have also been registered against people.
The Meetings of Minds: A Bridging Initiative – Dr Khawaja Iftikhar Ahmed’ या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. संघाच्या मुस्लीम राष्ट्रीय मंचाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते.
मॉब लिंचिंगसारख्या घटनांमध्ये अडकलेले लोक हिंदुत्वाशी प्रतारणा करतात. मॉब लिंचिंग हे हिंदुत्व नाही. पण अर्थात काही वेळा मॉब लिंचिंगच्या खोट्या केसेसही दाखल केल्या गेल्या आहेत, याकडे डॉ. मोहन भागवत यांनी लक्ष वेधले.
भारतात मुसलमानांना कोणताही धोका नाही. उलट इस्लाम खतरे में हे जाळे आहे. आपण त्या जाळ्यात अडकून आपल्या मूलभूत ऐक्याला तडा देता कामा नये. देशात ऐक्य असल्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही आणि ऐक्यासाठी संवादाची गरज आहे. वितुष्टाची नाही, असे मतही सरसंघचालकांनी व्यक्त केले.
संघाचा मुस्लीम मंच हा काही मेक ओव्हरचा प्रकार वगैरे काही नाही. संघ समाजाच्या ऐक्यासाठी आणि मजबूतीसाठी नेहमी काम करतो आणि करत राहणार आहे. संघाला मेक ओव्हर करून संघाला काही मते मागायची नाहीत, याकडे सरसंघचालकांनी आवर्जून लक्ष वेधले.
देशात नेहमी वापरल्या जाणाऱ्या हिंदू – मुस्लीम ऐक्य या संकल्पनेवर त्यांनी परखड भाष्य केले आहे. हिंदू – मुस्लीम ऐक्य ही दिशाभूल करणारी संकल्पना आहे. कारण मूळातच ते एकमेकांपासून भिन्न नाहीत, असे प्रतिपादन सरसंघचालकांनी केले.
डॉ. मोहन भागवतांनी अत्यंत परखड शब्दांमध्ये भारतीय राजकारणावर भाष्य केले. ते म्हणाले, की देशात अशी काही कामे आहेत, की जे राजकीय क्षेत्र करू शकत नाही. राजकारण हे जनतेच्या ऐक्याचे साधन बनू शकत नाही. उलट कधी कधी राजकारण हे जनतेचे ऐक्य तोडणारे हत्यार बनते. आपल्याला समाजहितासाठी राजकारणा पलिकडे जाऊन विचार केला पाहिजे.
हिंदू – मुस्लीम ऐक्य या संकल्पनेवर बोलताना डॉ. मोहन भागवत म्हणाले, की मूळातच हिंदू – मुस्लीम ऐक्य हा शब्दप्रयोग दिशाभूल करणारा आहे. कारण दोन भिन्न समूदायांचे ऐक्य होऊ शकते. भारतातले हिंदू आणि मुसलमान हे एकाच पूर्वजांचे वंशज आहेत. तेही गेल्या ४० वर्षांपासून…!! हे आता सिध्द झाले आहे. सर्व भारतीयांचा DNA सारखा आहे. त्यामुळे हिंदू – मुस्लीम ऐक्य वगैरे शब्दांचा वापर करून अनेकदा हे दोन्ही समाज भिन्न असल्याचे भासविण्याचा प्रयत्न होतो. तो आपण य़शस्वी होऊ देता कामा नये, असा इशाराही त्यांनी दिला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App