रायगड जिल्हा बनलाय महाराष्ट्राचा ऑक्सिजन पॉवरहाऊस

कोरोना महामारीच्या काळात महाराष्ट्रात ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. यावेळी रायगड जिल्हा महाराष्ट्राचे ऑक्सिजन पॉवरहाऊस म्हणून पुढे आला आहे. ऑक्सिजन उत्पादनाचे हब बनलेल्या रायगडमध्ये सध्या दररोज ६५० मेट्रिक टन ऑक्सिजन तयार होत आहे. राज्याच्या ऑक्सिजनच्या गरजेपैकी अर्धी गरज रायगड जिल्ह्यातून भागविली जात आहे. Raigad district has become the oxygen powerhouse of Maharashtra


विशेष प्रतिनिधी

मुंबई : कोरोना महामारीच्या काळात महाराष्ट्रात ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. यावेळी रायगड जिल्हा महाराष्ट्राचे ऑक्सिजन पॉवरहाऊस म्हणून पुढे आला आहे. ऑक्सिजन उत्पादनाचे हब बनलेल्या रायगडमध्ये सध्या दररोज ६५० मेट्रिक टन ऑक्सिजन तयार होत आहे. राज्याच्या आॅक्सिजनच्या गरजेपैकी अर्धी गरज रायगड जिल्ह्यातून भागविली जात आहे.

रायगडमधील ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांनी आपली निर्मिती क्षमता चाळीस टक्यांनी वाढविली आहे. रायगड जिल्ह्याची दररोजची मेडीकल ऑक्सिजनची गरज केवळ ३० मेट्रिक टन आहे. मात्र, हा जिल्हा महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांनामदत करत आहे. मुंबईला दररोज २४० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज आहे. त्यापैकी १८० टन रायगडमधून पुरविलाजातो. याशिवाय रत्नागिरी, सिंधूदूर्ग, सातारा, बीड, जालना, कोल्हापूर, मराठवाड्यातील सगळ्या जिल्ह्यात येथून ऑक्सिजन पोहोचविला जात आहे.कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी रायगडची ऑक्सिजन निर्मितीची क्षमता ४०० मेट्रिक टन होती. मात्र आता हिच क्षमता ६५० मेट्रिक टनापर्यंत वाढली आहे. आम्ही राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना ऑक्सिजन पुरवित आहोत. निर्मिती क्षमता ४० टक्यांनी वाढविली असल्याचे रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले.

केवळ निर्मिती क्षमता वाढविली नाही तर औद्योगिक वापराच्या ऑक्सिजनचे अनेक प्लॅँट वैद्यकीय वापरासाठीच्या ऑक्सिजनसाठी बदलण्यात आले. रायगड जिल्ह्यात पेण, डोलवी, माणगाव आणि तळोजा येथे महत्वाचे प्रकल्प आहे. अनेक पोलाद कंपन्यांनाही ऑक्सिजन बनविण्यास सांगितले आहे, असे चौधरी यांनी सांगितले.

Raigad district has become the oxygen powerhouse of Maharashtra

महत्वाच्या बातम्या