तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी राजभवनात सोडली मेंढरे, आंदोलनाची राज्यपालांकडून गंभीर दखल


पश्चिम बंगालमधील दोन मंत्र्यांना सीबीआयने अटक केल्यानंतर तृणमूल कार्यकर्त्यांनी राजभवनासमोर निदर्शने सुरू केली आहेत. काही आंदोलकर्त्यांनी परिसरात मेंढरांचे कळप आणून सोडले होते. मागील दोन दिवसांपासून राजभवनाबाहेर सुरू असलेल्या निदर्शनांची पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकड यांनी गंभीर नोंद घेतली आहे. या भागात प्रतिबंधात्मक नियम लागू असताना देखील परिस्थिती हाताळली जात नसल्याने त्यांनी शहर पोलिसांकडून अहवाल मागविला आहे.Trinamool activists leave sheep in Raj Bhavan, agitation gets serious attention from Governor


विशेष प्रतिनिधी

कोलकत्ता : पश्चिम बंगालमधील दोन मंत्र्यांना सीबीआयने अटक केल्यानंतर तृणमूल कार्यकर्त्यांनी राजभवनासमोर निदर्शने सुरू केली आहेत. काही आंदोलकर्त्यांनी परिसरात मेंढरांचे कळप आणून सोडले होते.

मागील दोन दिवसांपासून राजभवनाबाहेर सुरू असलेल्या निदर्शनांची पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकड यांनी गंभीर नोंद घेतली आहे. या भागात प्रतिबंधात्मक नियम लागू असताना देखील परिस्थिती हाताळली जात नसल्याने त्यांनी शहर पोलिसांकडून अहवाल मागविला आहे.



राज्यपालांनी ट्विटरवर राजभवनाबाहेरील दोन घटनांची चित्रफीत टाकत कोलकाता पोलिसांच्या अधिकृत हँडलला टॅग केले आहे. आंदोलनावर त्यावर करण्यात आलेल्या कारवाईंबद्दल अहवाल पाठविण्यास सांगितले.

सीबीआयने नारदा घोटाळा प्रकरणी तृणमूलच्या मंत्र्यासह तीन वरिष्ठ नेत्यांना अटक केल्यानंतर तृणमूल कार्यकर्त्यांनी राजभवनासमोर निदर्शने सुरू केली आहेत.

राज्यात बिघडत्या कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा उचलून करणारे धनकड यांनी निदर्शकांवर कायद्याची अवहेलना करण्यासह धमक्या दिल्याचा आणि पोलिसांनी याची दखल न घेतल्याचा आरोप केला आहे.

परिसरात कलम 144 लागू असून, प्रतिबंधात्मक आदेश जारी आहेत. अशा परिस्थिती पण पोलिसांकडून कुठलीही कारवाई केली जात नसल्याने शहर पोलिसांनी सांयकाळपर्यंत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

Trinamool activists leave sheep in Raj Bhavan, agitation gets serious attention from Governor

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात