तृणमूलच्या जाहीरनाम्यात ममतादीदींकडून आश्वासनांची बरसात, प्रत्येक कुटुंबाला किमान उत्पन्नाची हमी

विशेष प्रतिनिधी

कोलकता : पश्चिlम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या सर्वोसर्वा ममता बॅनर्जी यांनी आज पक्षाचा अधिकृत जाहीरनामा प्रसिद्ध केला. राज्यातील प्रत्येक कुटुंबाला किमान उत्पन्नाची हमी राज्य सरकारने दिली असून यान्वये सर्वसाधारण श्रेणीतील १ कोटी ६ लाख लोकांना दरमहा पाचशे रुपये तर अनुसूचित जाती आणि जमाती गटातील जातींना एक हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. ही मदत संबंधित कुटुंबाची प्रमुख असणाऱ्या महिलेच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल, असे ममतांनी सांगितले. TMC releases Assembly Poll manifesto

राज्यातील ४७ लाख लोकांना नळातून पाणी पुरवठा करण्याबरोबरच दीड कोटी लोकांना मोफत रेशन देण्याचे आश्वाूसन पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले. मा माटी आणि मानूष हेच तत्त्व या जाहीरनाम्याच्या केंद्रस्थानी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.अन्य आश्वाासने अशी – गरिबांना वार्षिक सहा हजारांची मदत करणार, दिल्लीच्या धर्तीवर प्रत्येक घरी रेशन योजना, विधवा महिलांना एक हजारांची मदत देणार ,कन्याश्री, रुपश्री, स्वास्थ साथी योजना सुरू राहणार ,विद्यार्थ्यांसाठी वेगळे क्रेडिट कार्य सुरू करणार , बंगाल आवास अंतर्गत २५ हजार घरांची निर्मिती.

TMC releases Assembly Poll manifesto

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*