चपला केल्या साफ, घासून झाली भांडी; तरी राहुल गांधींना का मिळेना शिखांच्या विश्वासाची कमाई??


नाशिक : चपला केल्या साफ, घासून झाली भांडी; तरी राहुल गांधींना का मिळेना शिखांच्या विश्वासाची कमाई??, असे विचारण्याची वेळ काँग्रेस खासदार राहुल गांधींच्या एका राजकीय कृतीने आणली आहे.Rahul Gandhi pays service in golden temple but could not win the trust of Sikh community

ही राजकीय कृती अशी :

राहुल गांधींनी दोन-तीन दिवस अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात जाऊन सेवा केली. तिथे भाविकांच्या चपला साफ केल्या. लंगर मध्ये जाऊन भाविकांना प्रसाद वाढप केले आणि भाविकांची तसेच स्वयंपाकाची भांडी देखील घासली. त्याचे फोटो आणि व्हिडिओ आपल्या वेगवेगळ्या सोशल मीडिया अकाउंट वर शेअर केले.



तसेही शीख समुदायात कोणत्याही गुरुद्वारात जाऊन लंगर मध्ये भाग घेऊन सेवा करण्याची उच्च प्रथा परंपरा आहेच. गुरुद्वारात जाऊन भाविकांची पदसेवा किंवा अन्य साफसफाईच्या सेवा करणे हा शीख समुदाय सन्मान मानतो. त्याचबरोबर जो शीख व्यक्ती काही गंभीर चुका करतो, त्याला देखील सेवा करण्याच्याच शिक्षा फर्मावल्या जातात. अशा शिक्षा माजी राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग आणि माजी गृहमंत्री बुटा सिंह यांच्यासारख्या अतिवरिष्ठ नेत्यांनी देखील भोगल्या होत्या. त्यांनी भाविकांच्या चपला साफ केल्या आणि त्यानंतरच शीख धर्मगुरूंनी त्यांना त्यांच्या चुकीबद्दल माफ केले होते. शीख समुदायातील बडे व्यक्तींची अशी अनेक उदाहरणे आहेत.

राहुल गांधींनी देखील अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात जाऊन अशीच सेवा केली. वर उल्लेख केल्याप्रमाणे त्यांनी भाविकांच्या चपला साफ केल्या. सुवर्ण मंदिरातील काही ठिकाणांची साफसफाई केली. तिथल्या सेवकांना मदत केली. लंगर मध्ये जाऊन प्रसादाचे वाढप केले आणि स्वयंपाकाची भांडी तसेच भाविकांच्या उष्ट्या ताट वाट्याही घासल्या.

पण राहुल गांधींची ही सेवा शीख समुदायाचे सर्वोच्च धर्मपीठ शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी यांनी “सेवा” या स्वरूपाची मानलीच नाही. उलट राहुल गांधींनी इथे येऊन जी सेवा केली, ती राजकीय होती, असे वक्तव्य शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे सचिव गुरुचरण सिंह ग्रेवाल यांनी केले आणि या वक्तव्यातच शीख समुदायाच्या सुखाचे गांभीर्य दडले आहे. कारण ग्रेवाल यांच्या वक्तव्याचा पुढचा भाग अधिक महत्त्वाचा आहे.

ग्रेवाल म्हणाले, राहुल गांधींच्या आजींनी सुवर्ण मंदिरात लष्कर घुसविले होते. शीख समुदायाचे सर्वोच्च स्थान अकाल तख्ताची तोडफोड केली होती, इतकेच नाही तर इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधींच्या सरकारच्या काळात दिल्लीच्या दंगलींमध्ये शीख समुदायाचे मोठे हत्याकांड झाले. राजीव गांधींची हत्या करणाऱ्या नलिनीला भेटायला राहुल गांधी गेले, पण दिल्लीतल्या शीख विधवांच्या कॉलनीत जाऊन त्यांनी त्यांचे अश्रू पुसले नाहीत. राहुल गांधी आजही जगदीश टायटलर आणि माकन यांना शेजारी घेऊन बसतात. ते शीख समुदायाचे हत्यारे आहेत.

गुरुचरण सिंह ग्रेवाल यांच्या या वक्तव्याचे हेच नेमके गांभीर्य आहे. गांधी परिवार आणि काँग्रेस यांच्याविषयी शीख समुदायाच्या मनात तीव्र संताप आहे. भले पंजाब मध्ये मध्यंतरीच्या काळात काही काँग्रेस सरकारे येऊन गेली असतील, पण त्याची कारणे पंजाब मधल्या स्थानिक अकाली राजकारणात दिसतील, पण त्याचा अर्थ गांधी परिवाराविषयी शीख समुदायाच्या मनात असलेला संताप कमी झाला असा काढता येणार नाही.

उलट राहुल गांधींनी सुवर्ण मंदिरात जाऊन सेवा जरूर केली, पण त्यामुळे शीख समुदायाच्या जखमांवर खरी फुंकर घातली गेली नाही, असाच त्याचा अर्थ काढावा लागेल. गुरुचरण सिंह ग्रेवाल यांचे वक्तव्य शीख समुदायाच्या त्या संतापाचेच निदर्शक आहे.

Rahul Gandhi pays service in golden temple but could not win the trust of Sikh community

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात