पीएम मोदींच्या हस्ते 29 बालकांचा राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मान, अशी आहे निवड प्रक्रिया, वाचा सविस्तर…


हा पुरस्कार अशा मुलांना दिला जाईल जे भारताचे नागरिक आहेत आणि भारतात राहतात. अशा मुलांचे वय 5 वर्षांपेक्षा जास्त आणि 18 वर्षांपेक्षा कमी असावे.PM Modi honors 29 children with National Children’s Award, this is the selection process, read more …


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार (PMRBP) विजेत्यांशी संवाद साधला आहे.PMRBP च्या प्रत्येक पुरस्कारार्थीला एक पदक, रोख एक लाख रुपये आणि प्रमाणपत्र दिले जाते.PMRBP चे पुरस्कार विजेते दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये देखील सहभागी होतात.

बाल शक्ती पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये या वर्षी देशभरातील 29 मुलांची राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.यावर्षी 29 बालकांना राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरविण्यात येत आहे. हा पुरस्कार 6 श्रेणींमध्ये अपवादात्मक कामगिरी करणाऱ्या मुलांना दिला जातो.



राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांना प्रमाणपत्र देण्यासाठी प्रथमच ब्लॉक चेन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.मार्गदर्शक तत्त्वानुसार, हा पुरस्कार अशा मुलांना दिला जाईल जे भारताचे नागरिक आहेत आणि भारतात राहतात. अशा मुलांचे वय 5 वर्षांपेक्षा जास्त आणि 18 वर्षांपेक्षा कमी असावे.

या श्रेणींमध्ये हे पुरस्कार दिले जातात

1. नवोन्मेष : विज्ञान आणि सामाजिक विज्ञानातील यश मिळवणारे व त्यांच्या कल्पकतेचा मानवांवर तसेच प्राणी आणि पर्यावरणावर कोणताही परिणाम झाला असावा.

2. सामाजिक कार्य : बालविवाह, लैंगिक शोषण, दारू इ. यांसारख्या सामाजिक वाईट गोष्टींविरुद्ध समाजाला प्रेरित किंवा किंवा संघटित केले असावे.

3. शिक्षण : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या बालकाने सातत्यपूर्ण कामगिरी केलेली असावी.

4. खेळ : राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली असावी.

5. कला आणि संस्कृती : संगीत, नृत्य, चित्रकला किंवा कला आणि संस्कृतीशी संबंधित इतर विषयांमध्ये त्याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभाग घेतला असावा.

६. शौर्य : जीव धोक्यात घालून निःस्वार्थ सेवा करणाऱ्या मुलांचा यात समावेश होतो. उदाहरणार्थ नैसर्गिक किंवा मानवनिर्मित अशा कोणत्याही परिस्थितीत धैर्याने वागणारी मुले असावीत. किंवा मग अशी मुले जी कोणत्याही धोक्याच्या प्रसंगी आपल्या बुद्धिमत्तेचा आणि मानसिक शक्तीचा असाधारण वापर करतात.

PM Modi honors 29 children with National Children’s Award, this is the selection process, read more …

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात