Republic Day 2021 : राष्ट्रीय बाल पुरस्कारावर नाव कोरणाऱ्या 32 शूर मुलांचे पराक्रम वाचून व्हाल अवाक् !

Republic Day 2021: Read Amazing Stories Of All 32 Childrens Who Received PM National Children Awards

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार’ प्राप्त झालेल्या मुलांचे अभिनंदन केले. पंतप्रधानांनी ट्वीट करतानाच ज्या बालकांना पुरस्कार जाहीर झाला, त्यांचा परिचयही करून दिला आहे. पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार शिक्षण, क्रीडा, कला, संस्कृती, समाजसेवा आणि शौर्य या क्षेत्रांत असाधारण कर्तृत्वासाठी देण्यात येतो. Republic Day 2021: Read Amazing Stories Of All 32 Childrens Who Received PM National Children Awards


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार’ प्राप्त झालेल्या मुलांचे अभिनंदन केले. पंतप्रधानांनी ट्वीट करतानाच ज्या बालकांना पुरस्कार जाहीर झाला, त्यांचा परिचयही करून दिला आहे. पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार शिक्षण, क्रीडा, कला, संस्कृती, समाजसेवा आणि शौर्य या क्षेत्रांत असाधारण कर्तृत्वासाठी देण्यात येतो.

32 मुलांना राष्ट्रीय बाल पुरस्कार

पंतप्रधानांचा राष्ट्रीय बाल पुरस्कार महिला व बाल विकास मंत्रालयाने दिला आहे. या वेळी 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या 32 जिल्ह्यांतील मुलांना पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
मंत्रालयाच्या मते, यावर्षी नावीन्यपूर्णतेसाठी नऊ पुरस्कार देण्यात आले आहेत. कला आणि संस्कृती क्षेत्रात सात पुरस्कार देण्यात आले आहेत. शैक्षणिक कामगिरीसाठी पाच पुरस्कार, क्रीडा प्रकारातील सात पुरस्कार, शौर्य व तीन मुलांना सामाजिक सेवा क्षेत्रात केलेल्या प्रयत्नासाठी एक पुरस्कार देण्यात आला आहे.

विजेत्यांचे कौतुक करताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले होते की, “मला आशा आहे की पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार-2021 विजेत्यांना उत्तेजनच देणार नाही, तर कोट्यवधी तरुणांना स्वप्ने, आकांक्षा आणि त्यांची सीमा वाढविण्यात मदत करेल.”

या सर्व विजेत्यांचे थोडक्यात परिचय आणि छायाचित्रे घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटद्वारे त्यांचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधानांनी स्वत: या सर्व मुलांशी संवाद साधला.

Republic Day 2021: Read Amazing Stories Of All 32 Children’s Who Received PM National Children Awards

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, काहीजण क्रीडा क्षेत्रात देशाचा नावलौकिक करत आहे, काहीजण आधीपासूनच संशोधन आणि नावीन्यपूर्ण काम करत आहेत. तुमच्यातूनच उद्या भारताचे खेळाडू, शास्त्रज्ञ, नेते, देशातील मोठे सीईओ बनतील आणि भारताची गौरवशाली परंपरा पुढे नेतील. देशाचे भविष्य असलेल्या देशभरातील मुलांनीही कोरोना साथीला लढा देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती