Maharashtra CM LIVE : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातील जनतेला संबोधित करणार


  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज (8 ऑगस्ट) राज्यातील जनतेला संबोधित करणार आहेत. यावेळी ते नेमकं काय बोलणार याकडेच आता अवघा महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे.

विशेष प्रतिनिधी 

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज रविवार 8 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता सोशल मीडियावरून राज्यातील जनतेला संबोधित करणार आहेत. याबाबतची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे. Maharashtra CM LIVE: Chief Minister Uddhav Thackeray will address the people of the state today

राज्यात सध्या कोरोनाचा (Corona)) संसर्ग कमी झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे राज्यातील जवळजवळ 25 जिल्ह्यात लॉकडाऊनसंबंधी (Lockdown) जे कठोर नियम होते ते आधीच शिथिल करण्यात आले आहेत. मात्र असं असलं तरीही अद्याप संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) निर्बंध शिथिल करण्यात आलेले नाही. राज्यात जवळजवळ 11 जिल्ह्यांमध्ये लेव्हल 3 निर्बंध आहेत. अशावेळी या सगळ्याबाबत मुख्यमंत्री आजच्या संबोधनात काही महत्त्वाच्या घोषणा करण्याची शक्यता आहे.

राज्यातील 11 जिल्ह्यात अद्यापही निर्बंध कायम आहेत. कारण येथील अनेक भागात कोरोना रुग्णांची संख्या ही चिंता वाढवणारी आहे. ज्यामुळे येथील भागातील दुकानं फार कमी वेळ सुरु ठेवता येत आहे. त्यामुळे येथील व्यापारी वर्गाची मागणी आहे की, लवकरात लवकर येथील दुकानं सुरु ठेवण्याची वेळ वाढविण्यात यावी.

व्यापारी वर्गाला दिलासा देण्याचा काही मुख्यमंत्री निर्णय घेणार का? याकडेही अनेकांचं लक्ष असणार आहे.

Maharashtra CM LIVE: Chief Minister Uddhav Thackeray will address the people of the state today

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात