खुशखबर ! अबब आता मिळणार तब्बल 1 लाख रोजगार : दिग्गज आयटी कंपनीच्या उत्पन्नात थेट 41.8 टक्के वाढ


  •  कंपनीचे एकूण उत्पन्न 41.8 टक्क्यांनी वाढून 51.2 कोटी अमेरिकन डॉलर एवढे (अंदाजे 3,801.7 कोटी) झाले आहे. कंपनीने बुधवारी याबाबत माहती दिली .

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: नोकरीच्या शोधात असणार्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दिग्गज आयटी कंपनी कॉग्निझंट यंदा एक लाख लोकांना नोकऱ्या देणार आहे. जूनच्या तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न 41.8 टक्क्यांनी वाढून 51.2 कोटी अमेरिकन डॉलर एवढे (अंदाजे 3,801.7 कोटी) झाले आहे. कंपनीने बुधवारी याबाबत माहिती दिली आहे. जून 2020 च्या तिमाहीत अमेरिकेतील कंपनीचे एकूण उत्पन्न 36.1 कोटी डॉलर होते.Good news! will now get 1 lakh jobs: Direct growth of 41.8 per cent in the income of the giant IT company

तिमाहीत कंपनीचा महसूल 14.6 टक्क्यांनी वाढून 4.6 अब्ज डॉलर झाले.

कॉग्निझंटने आर्थिक वर्ष 2021 साठीच्या कमाईच्या वाढीचे लक्ष्य 10.2-11.2 टक्क्यांपर्यंत वाढवले. मागील तिमाहीत कंपनीचा महसूल 14.6 टक्क्यांनी वाढून 4.6 अब्ज डॉलर झाला, जो मागील वर्षातील याच कालावधीत 4 अब्ज अमेरिकन डॉलर्स होता. कंपनीच्या अंदाजापेक्षा हा आकडा जास्त आहे.

कॉग्निझंट सीईओ ब्रायन हम्फ्रीजच्या म्हणण्यानुसार, 2020 मध्ये आम्ही जवळपास 1 लाख भरती आणि जवळपास 1 लाख सहकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची तयारी करतोय. याशिवाय कॉग्निझंट 2021 मध्ये सुमारे 30,000 नवीन पदवीधर आणि 2022 साठी भारतातील नवीन पदवीधरांना 45,000 ऑफर देण्याची अपेक्षा करतो.

 

Good news! will now get 1 lakh jobs: Direct growth of 41.8 per cent in the income of the giant IT company

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”