बड्या – बड्या नेत्यांच्या गळतीच्या चर्चा; काँग्रेस – राष्ट्रवादीतल्या “सिमेंटिंग फोर्स”च्या उडताहेत ढलप्या!!


2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बड्या -‘बड्या नेत्यांच्या गळतीच्या चर्चा आणि काँग्रेस – राष्ट्रवादीच्या सिमेंटिंग फोर्सच्या उडत आहेत ढलप्या!!, असे खरंच घडते आहे.Cementing force of Gandhi and pawar has reduced to prevent the further splits in their parties

“सिमेंटिंग फोर्स” हा शरद पवारांचा लाडका राजकीय शब्द आहे. गांधी परिवार हा काँग्रेस मधला “सिमेंटिंग फोर्स” आहे. कारण काँग्रेस मधल्या विविध समाज घटकांच्या नेत्यांना आणि अगदी परस्पर विरोधी गटातल्या नेत्यांना एकमेकांशी जोडून ठेवण्याचे काम गांधी परिवार करतो, असा शरद पवारांचा युक्तिवाद आहे.खरं तर हाच युक्तिवाद खुद्द शरद पवारांच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेसला लागू आहे. किंबहुना होता. शरद पवार या नावाभोवतीच राष्ट्रवादी काँग्रेसने कायम “राजकीय फेर” धरला. त्यांच्या नावाभोवतीच राष्ट्रवादी काँग्रेस वाढली. कमी झाली. पुन्हा वाढली. पुन्हा कमी झाली आणि आता फुटली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससाठी शरद पवार स्वतःच एक “सिमेंटिंग फोर्स” आहेत आणि होते.

पण आता गांधी परिवार आणि शरद पवार या “सिमेंटिंग फोर्स”च्याच ढलप्या उडू लागल्या आहेत. कारण त्यांच्यातले “सिमेंट” नावापुरते उरले असले तरी त्यातला “फोर्स” निघून गेला आहे.

मध्य प्रदेशात कमलनाथ, त्यांचे पुत्र नकुलनाथ आणि त्यांच्याबरोबर 23 आमदार काँग्रेस मधून फुटून भाजपच्या सत्तेच्या वळचणीला जाण्याच्या बेतात आहेत. त्यासंदर्भात रोज खुलासे – प्रतिखुलासे होत आहेत. मग स्वतः कमलनाथ फुटणार नाहीत, पण त्यांचे पुत्र नकुलनाथ काँग्रेसचे 23 आमदार घेऊन फुटतील, असे बोलले जात आहे. काँग्रेसचे 23 आमदार का??, तर काँग्रेसचे मध्य प्रदेशात आत्ताच 66 आमदार आहेत आणि पक्ष फुटला तर आमदारकी वाचवण्यासाठी किमान 23 या आकड्याची गरज आहे, म्हणून 23 आमदार एकत्रित करणे ही कमलनाथ आणि त्यांच्या सहकाऱ्यांची गरज आहे. एकदा ते काम पूर्ण झाले की, कमलनाथ आपल्या सगळ्या आमदारांसह काँग्रेस सोडून भाजपमध्ये येतील. मग काँग्रेसवाले त्यांना “इंदिराजींचे तिसरे पुत्र” म्हणोत किंवा आणखी कुठली नावे ठेवोत. कमलनाथ बधण्याची शक्यता कमी आहे!!

मध्य प्रदेशात जे कमलनाथांचे तेच महाराष्ट्र जयंत पाटलांचे.

काँग्रेस मधून फुटून अशोक चव्हाण भाजपमध्ये दाखल झाले आणि दुसऱ्या दिवशी राज्यसभेची उमेदवारी मिळवतेही झाले. अशोक चव्हाणांसारख्या मातब्बर नेत्याला भाजप ताबडतोब सामावून घेऊन राज्यसभेचे उमेदवारी देते ही लालूच काँग्रेस मधल्या इतरांना तर आहेच, पण राष्ट्रवादीतल्या शरद पवारांच्या जवळ असणाऱ्या जयंत पाटलांना देखील आहे. अशोक चव्हाणांचे बस्तान भाजप बसवू शकतो तर आपले स्थानिक पातळीवर किंवा अगदी दिल्लीत बस्तान बसवणे भाजपला अवघड नाही हा जयंत पाटलांचा होरा आहे आणि पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या उरल्या सुरल्या बालेकिल्ल्यांना सुरुंग लावण्यासाठी जयंत पाटलांचा का मोहरा गळाला लावणे भाजपला सोपे आहे.

अजित पवारांबरोबरच फुटण्यात जयंत पाटलांना म्हणे अडचण होती. ते जलसंपदा खात्यावर अडून बसले होते आणि फडणवीस तेच सोडायला तयार नव्हते, असे बोलले जात होते. पण प्रत्यक्षात “ते” “तसेच” होते, याचे कोणाकडेही पुरावे नव्हते आणि ते आजही नाहीत.

त्यामुळे अशोक चव्हाण यांच्यासारख्या मातब्बराला जर भाजप व्यवस्थित “ऍडजेस्ट” करू शकतो, तर त्या तुलनेत कमी मातब्बर असणाऱ्या जयंत पाटलांना “ऍडजेस्ट” करणे फारसे अवघड असणार नाही हे उघड आहे. त्यामुळे जयंत पाटीलही शांतपणे पवारांच्या “सिमेंटिंग फोर्सचा” ढलपा काढून हळूच भाजपच्या सत्तेच्या वळचणीला येऊन बसण्याची शक्यता आहे.

हे सगळे घडत असताना राहुल गांधी मात्र राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यात ओबीसी कसे नव्हते, 73% समाजाला भाजप कसा वगळतो आहे वगैरे जातीय गरळ ओकत राहिलेत आणि शरद पवार आपला पक्ष आणि चिन्ह पूर्ण गमावल्यानंतर सुप्रीम कोर्टात धाव घेते झालेत. या पलीकडे आपल्याच पक्षातल्या नेत्यांना खेचून धरण्याचा अथवा टिकवून ठेवण्याचा या “सिमेंटमध्ये” मधला कुठलाच “फोर्स” उरला नाही, हेच यातून दिसून येते!!

Cementing force of Gandhi and pawar has reduced to prevent the further splits in their parties

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात