वृत्तसंस्था
मॉस्को : राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे सर्वात मोठे विरोधक अलेक्सी नवलनी यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा दावा रशियन मीडियामध्ये केला जात आहे. त्यांच्या शरीरावर जखमा आढळल्या. मात्र, मृत्यूला चार दिवस उलटूनही पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलेला नाही. Putin opponent Navalny found with head and chest wounds; Claims that a heart attack is caused by muscle spasms
नवलनी यांचा 16 फेब्रुवारी रोजी तुरुंगात मृत्यू झाला. यानंतर पुतिन यांनीच त्यांची हत्या केल्याचे त्यांच्या टीमने सांगितले.
स्वतंत्र रशियन वृत्तपत्र नोवाया गॅझेटा युरोपने एका डॉक्टरचा हवाला देत आपल्या रिपोर्टमध्ये लिहिले आहे – जेव्हा नवलनी यांना रुग्णालयात आणले गेले, तेव्हा त्यांच्या डोक्यावर आणि छातीवर जखमा होत्या.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, नवलनीच्या शरीरावर ज्या प्रकारच्या जखमा आढळल्या आहेत त्या स्नायूंच्या आकुंचनमुळे होतात. जेव्हा स्नायू आकुंचन पावतात तेव्हा हृदयापर्यंत पोहोचणारा रक्तप्रवाह थांबतो. यामुळे कार्डियाक अरेस्ट होतो.
तुरुंगात आजारी पडले
पोलर वुल्फ या रशियातील सर्वात धोकादायक तुरुंगात नवलनींचा मृत्यू झाला. नवलनी यांची प्रकृती खालावली असल्याचे तुरुंग अधिकाऱ्यांनी सांगितले होते. ते फिरून परतले होते, त्यानंतर त्यांची तब्येत ठीक नसल्याचे दिसले. तेव्हा ते बेशुद्ध पडले होते.
नवलनी यांच्या मृत्यूला चार दिवस उलटूनही त्यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलेला नाही. त्याचवेळी त्यांचा मृतदेह कुटुंबीयांना दिला जात नसल्याचा आरोप नवलनी यांच्या टीमने केला. पुतिन यांचे प्रशासन नवलनी यांच्या मृत्यूचे सत्य लपविण्याचा प्रयत्न करत आहे. नवलनीच्या प्रवक्त्या किरा यार्मिश यांनी सांगितले की, त्यांना खात्री आहे की नवलनींची हत्या झाली आहे. त्याचे आदेश खुद्द राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी दिले आहेत.
32 शहरांमधून 400 जणांना अटक
नवलनी यांच्या मृत्यूनंतर लोक रस्त्यावर उतरले आहेत. नवलवी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांनी सेंट पीटर्सबर्गमधील राजकीय दडपशाहीच्या बळींच्या स्मारकाला आणि मॉस्कोमधील दु:खाच्या भिंतीला भेट दिली. येथून त्यांना अटक करण्यात आली. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रशियाच्या 32 शहरांमधून पोलिसांनी आतापर्यंत 400 लोकांना अटक केली आहे.
नवलनीच्या मृत्यूच्या एका दिवसानंतर, त्यांची पत्नी युलिया नवलनाया म्हणाल्या- पुतिन आणि त्यांच्या साथीदारांना सोडले जाणार नाही. आम्ही पुतिन आणि त्यांच्या सरकारवर विश्वास ठेवू शकत नाही. ते नेहमी खोटे बोलतात, पण माझ्या पतीच्या मृत्यूमागे त्यांचा हात असल्याचे सिद्ध झाले तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. हा दिवस लवकरच येणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App