एकाही मुस्लिमाला राज्यसभेचे तिकीट न दिल्याने संताप
विशेष प्रतिनिधी
लखनऊ : लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अनेक बडे नेते आपला पक्ष सोडून इतर पक्षात जात आहेत. काही नेते पक्षातील पदे सोडून नाराजी व्यक्त करत आहेत. उत्तर प्रदेशमधून पाच वेळा खासदार राहिलेले सलीम इक्बाल शेरवानी यांनी आता समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला आहे.Five time MP Salim Sherwani has resigned from the post of General Secretary of SP
सलीम शेरवानी यांनी रविवारी दुपारी आपल्या पदाचा राजीनामा जाहीर केला. पुढील काही आठवड्यांत आपल्या राजकीय भवितव्याबाबत निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शेरवानीने दिल्लीतील इस्लामिक कल्चर सेंटरमध्ये आपल्या समर्थक आणि जवळच्या लोकांसोबत बैठक घेतली. यानंतर त्यांनी पक्षाच्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. राज्यसभेत एकाही मुस्लिमाला तिकीट न दिल्याने सलीम शेरवानी पक्ष हायकमांडवर नाराज आहेत. यामुळे त्यांनी सपाचे राष्ट्रीय सरचिटणीसपद सोडले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more