विशेष प्रतिनिधी
नागपूर: बॉम्बस्फोटातील आरोपी मुख्य दाऊद इब्राहीम याचा उजवा हात सलीम कुत्ता याच्या बरोबर ठाकरे गटाचे नाशिकचे नेते सुधाकर बडगुजर यांनी पार्टी केली. हा मुद्दा राज्याच्या राजकारणात अतिशय तापला असून सलीम कुत्ता पॅरोलवर सुटला होता. त्यांनी पार्टी केली कशी आणि त्यात सुधाकर बडगुजर सामील झालेच कसे??, याची स्पेशल इन्वेस्टीगेशन टीम मार्फत चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.Thackeray group leader Sudhakar Badgujar’s party with Dawood leader Salim Kutta; Fadnavis’ announcement of SIT probe
सलीम कुत्ता याच्यासोबत शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिकमधील महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी पार्टी केल्याचा मुद्दा आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत उपस्थित केला. यासंदर्भातील फोटो दाखवत गंभीर आरोप केले. सुधाकर बडगुजर याला कोणाचा वरदहस्त आहे, त्याला हिंदुत्ववादी असणाऱ्या पक्षाकडून कसे संरक्षण दिले जात आहे, शिवसेना भवन बॉम्बस्फोटाने उडवण्याचा कट करणाऱ्यांना संरक्षण देणाऱ्यांनाही समोर आणावे, अशी मागणी नितेश राणे यांनी सभागृहात केली. या प्रकरणात एसआयटी चौकशीची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. सुधाकर बडगुजर हे ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख आहे.
दादा भुसे, शेलार आक्रमक
नितेश राणे यांनी सलीम कुत्ता आणि सुधाकर बडगुजर यांचा फोटो दाखवल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील मंत्री दादा भुसे आक्रमक झाले. ते म्हणाले की, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा महानगर प्रमुख देशद्रोह्यासोबत पार्टी करतोय. मग या सुधाकर बडगुजरला वाचवण्यासाठी कोण फोन फोनी करतोय?? देशद्रोह्यासोबत डान्स पार्टी करणाऱ्यांना वाचवणारी राजकीय शक्ती कोण आहे?? यामध्ये आणखी कोणाचा सामील आहे? सुधाकर बडगुजरचे लागेबांधे कोणाशी आहेत?? बडगुजर हा छोटा मासा आहे. या प्रकरणात मोठ्या व्यक्तीलाही उघड करावे, अशी मागणी केली.
भाजप आमदार आशिष शेलार यांनी हा मुद्दा लावून धरला. १९९३ मधील बाँबस्फोटातील आरोपींशी संबंध ठेवणाऱ्यांना कोण वाचवत आहे. शिवसेना भवन उडवण्याचा कट असलेला आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत पार्टी केल्यानंतर त्या व्यक्तीवर कारवाई होत नाही. या घटनांमुळे दहशतवाद्यांचे इरादे पक्के होत जातात. या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी शेलार यांनी केली.
एसआयटी चौकशीची घोषणा
दाऊदचा म्होरक्यासोबत पार्टी करण्याचा प्रकार गंभीर आहे. हा सलीम कुत्ता पॅरोलवर असताना पार्टी कसा करू शकतो?? या कुत्ताशी त्या व्यक्तीचा संबंध काय??, त्यात कोण कोण सहभागी आहे?? बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत कोणी पार्टी करत असेल तर त्याची चौकशी होईल. ही चौकशी एसआयटीकडून करण्यात येईल. त्यासाठी एसआयटीला विशिष्ट काळाची मुदत दिली जाईल, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App