विशेष प्रतिनिधी
बीड : बीडमध्ये गेले शासन जनतेच्या दारी; बहीण भावांना एकत्र ताकद देण्याची शिंदे – फडणवीस यांची तयारी!!, असे आज घडले. Pankaja and dhanajay munde came together in beed parali program paved the way for their political conciliation
बीडमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, माजी पालकमंत्री पंकजा मुंडे हे एकाच व्यासपीठावर दिसले. त्यामुळे जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यात या “ऐक्याच्या राजकारणाची” फार मोठी चर्चा झाली. पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे गेली 5 वर्षे जो राजकीय संघर्ष झाला, त्याचा समारोप आजच्या एकत्र व्यासपीठावर बसून झाल्याचे बोलले गेले आणि दोन्ही नेत्यांना एकत्र लढण्यासाठी ताकद देण्याची भाषा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वापरली. त्यामुळे बीड जिल्ह्यात बहीण – भावांची ताकद एकत्र आल्याची चर्चा सुरू झाली.
पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा माध्यमे गेली 5 वर्षे अधून मधून करत राहिली. त्यांच्या मुलाखती प्रसिद्ध होत राहिल्या. त्यातून सूचक वक्तव्य प्रसिद्ध झाली, पण प्रत्यक्षात पंकजा मुंडे यांची “माध्यम निर्मित बंडखोरी” झाली नाही आणि आज अखेर शासन बीडमध्ये जनतेच्या दारी गेले आणि बहीण – भावांना एकत्र लढवण्याची ताकद शिंदे – फडणवीस देऊन आले!!
749 कोटींचे लाभ
शासन आपल्या दारी या सरकारच्या महत्वाकांक्षी अभियानाचा पुढचा टप्पा आज बीड जिल्ह्यातील परळी येथे पार पडला. यावेळी बीड जिल्ह्यातील लाभार्थ्यांना ७४९ कोटींच्या विविध शासकीय योजनांचे लाभ मिळवून देण्यात आले.
राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून नागरिकांचा सरकारी कार्यालयात हेलपाटे घालण्याचा त्रास कायमचा संपवण्यासाठी शासन आपल्या दारी कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. आज १ कोटी ८० लाखांहून अधिक लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचे लाभ मिळवून देण्यात आले आहेत. आज परळी येथे आयोजित करण्यात आलेला शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आजवरचे सारे उच्चांक मोडणारा होता, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
सर्वसामान्य लोकांना न्याय देणारे हे आपले सरकार असून या जिल्ह्यातील शेतकरी संकटात असल्याची आपल्याला पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय नक्की घेऊ असे यावेळी सांगितले. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना देखील पंचनामे झाल्यावर मदत जाहीर केली जाईल. तसेच कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
सरकार असताना ज्यांनी अडीच वर्षे घरात बसून कारभार केला ते आज शासन आपल्या दारी हा बोगस कार्यक्रम असल्याचे म्हणत आहेत. उलट या कार्यक्रमातून हजारो नागरिकांना शासकीय योजनांचे प्रत्यक्ष लाभ मिळत असून यामुळे तुमची बोगसगिरी लोकांच्या लक्षात आली असल्याचे मत व्यक्त केले.
धनंजय आणि पंकजा एकत्र
आज धनंजय आणि पंकजा ताई असे दोन्ही मुंडे या व्यासपीठावर एकत्र असून यापुढे एकत्रितपणे या जिल्ह्याचा विकास आपल्याला करायचा आहे असे स्पष्ट केले. या विभागातील तरुणांना रोजगार देण्यासाठी या भागात देखील उद्योग आणण्यासाठी नक्की प्रयत्न करू. मराठा समाजाला आरक्षण देताना कोणत्याही समाजावर अन्याय होऊ देणार नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असून त्यांना कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण नक्की मिळवून दिले जाईल याचा पुनरुच्चार केला.
यावेळी आमदार सुरेश धस, आमदार प्रकाश सोळंके, आमदार लक्ष्मण पवार, आमदार बाळासाहेब आजबे, आमदार नमिता मुंदडा, माजी मंत्री सुरेश नवले, माजी आमदार भीमराव धोंडे यांच्यासह बीड जिल्हा प्रशासनातील सर्व प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो लाभार्थी उपस्थित होते.
Pankaja and dhanajay munde came together in beed parali program paved the way for their political conciliation
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App