I.N.D.I.A. आघाडीच्या बैठकीला ममता बॅनर्जी जाणार नाही, म्हणाल्या…


जाणून घ्या, काय सांगितलं आहे कारण?

विशेष प्रतिनिधी

कोलकाता : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांनी स्थापन केलेल्या I.N.D.I.A. आघाडीची पुढील बैठक ६ डिसेंबरला होणार आहे. याबाबत प्रश्न विचारला असता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांनी बैठकीबाबतची माहिती नसल्याचे म्हटले. Mamata Banerjee will not go to the meeting of the I.N.D.I.A. alliance

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ६ डिसेंबर रोजी होणाऱ्या I.N.D.I.A. आघाडीच्या बैठकीबाबत त्या म्हणाल्या, “मला याबाबत माहिती नाही आणि उत्तर बंगालमध्ये माझे काही कार्यक्रम नियोजित आहेत. मला याबाबत माहिती असती तर मी या बैठकीला उपस्थित राहिले असते. उत्तर बंगालमधील कार्यक्रमास गेली नसते मात्र आता मी उत्तर बंगालच्या दौऱ्यावर जात आहे.”न्यूज एजन्सी एएनआयनुसार, टीएमसी सुप्रिमो म्हणाले, “मला माहीत नाही. माझ्याकडे माहिती आलेली नाही. म्हणूनच मी कार्यक्रम निश्चत केला. आमचा कार्यक्रम उत्तर बंगालमध्ये आहे. आमचा दिवसभराचा कार्यक्रम आहे. जर मला माहिती असते, तर आम्ही कोणताही कार्यक्रम निश्चित केला नसता आणि नक्कीच गेले असते.”

Mamata Banerjee will not go to the meeting of the I.N.D.I.A. alliance

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात