राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणातील मतमोजणीला सुरुवात


मतमोजणी केंद्रांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था, उपद्रवींवर पोलिसांची कडक नजर

विशेष प्रतिनिधी 

नवी दिल्ली : राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज 3 डिसेंबर रोजी लागणार आहेत. Counting of votes begins in Rajasthan Madhya Pradesh Chhattisgarh and Telangana

मतमोजणीच्या निकालावर संपूर्ण देशाचे लक्ष असेल. प्रत्यक्षात सार्वत्रिक निवडणुकीसाठी सहा महिन्यांहून कमी कालावधी शिल्लक आहे. अशा स्थितीत हे निकाल उपांत्य फेरीचे मानले जात आहेत. मतमोजणीसाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

मध्य प्रदेशच्या 230, छत्तीसगडच्या 90 जागा, तेलंगणाच्या 119 जागा आणि राजस्थानच्या 199 जागांसाठी कडेकोट बंदोबस्तात सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरूवाच झाली.

प्रथम पोस्टल मतपत्रिकेची मोजणी होईल, त्यानंतर ईव्हीएममधून मतमोजणी सुरू होईल. दीड तासानंतर कलाचे चित्र स्पष्ट होऊ लागेल. या चार राज्यांप्रमाणे मिझोराममध्ये तीन ऐवजी ४ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

Counting of votes begins in Rajasthan Madhya Pradesh Chhattisgarh and Telangana

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*