मिझोराममध्ये ZPM विजयी, MNF सत्तेतून बाहेर, कॉंग्रेसला मिळाली फक्त एक जागा


मुख्यमंत्री झोरमथांगा स्वतः निवडणूक हरले आहेत.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: ईशान्येकडील राज्य मिझोराममध्ये 7 नोव्हेंबर रोजी झालेल्या निवडणुकीसाठी सोमवारी मतमोजणी झाली. या निवडणुकीत सत्ताधारी पक्ष मिझो नॅशनल फ्रंटला (एमएनएफ) पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मुख्यमंत्री झोरमथांगा स्वतः निवडणूक हरले आहेत. ZPM wins in Mizoram MNF out of power Congress gets only one seat

झोराम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) ने राज्यात दणदणीत विजय नोंदवला आहे. 40 सदस्यीय विधानसभेत पक्षाने 27 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेस पक्षाला ईशान्य भारतातही निराशेचा सामना करावा लागला आहे. केवळ 1 जागेवरच पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत.

झोरम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) ने 40 जागांच्या विधानसभेत 27 जागा जिंकल्या आहेत. मिझो नॅशनल फ्रंटने (एमएनएफ) फक्त 10 जागा जिंकल्या आहेत, तर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी फक्त 2 जागा जिंकल्या आहेत, तर काँग्रेस पक्षाने फक्त एक जागा जिंकली आहे.

मिझोरामचे मुख्यमंत्री आणि MNF उमेदवार झोरामथांगा हे आयझॉल पूर्व-1 जागेवरून त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी आणि ZPM उमेदवार लालथनसांगा यांच्याकडून 2101 मतांनी पराभूत झाले.

ZPM wins in Mizoram MNF out of power Congress gets only one seat

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात