Chhattisgarh Result : हिंसाचारात मुलगा गमावलेल्या ईश्वर साहूंनी भाजपच्या तिकीटावर लढत काँग्रेसच्या मंत्र्याचा केला पराभव!

पराभूत झालेले रवींद्र चौबे काँग्रेसचे सातवेळा आमदार आणि मंत्री होते

विशेष प्रतिनिधी

छत्तीसगड  : छत्तीसगड विधानसभा निवडणुकीचे निकाल आले आहेत. राज्यात भाजप सरकार स्थापन करणार आहे. यावेळी भाजपने 90 पैकी 54 जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेस 35 जागांवर घसरली आहे. पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतील छत्तीसगडच्या निकालाने सर्वांनाच चकित केले आहे. सर्वात रंजक गोष्ट म्हणजे भाजपचे उमेदवार ईश्वर साहू यांनी छत्तीसगडमधील साजा मतदारसंघातून काँग्रेसचे सातवेळा आमदार आणि मंत्री रवींद्र चौबे यांचा पराभव केला आहे. Chhattisgarh Result Ishwar Sahu who lost his son in violence defeated the Congress minister fighting on BJP ticket

छत्तीसगडमधील बेमेटारा जिल्ह्यातील सजा विधानसभेच्या निकालाने सर्वांनाच चकित केले आहे. खरे तर या वर्षी एप्रिल महिन्यात दोन समाजातील हिंसाचारात ईश्वर साहू यांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत भाजपने ईश्वर साहू यांना तिकीट दिले. काँग्रेसने कृषीमंत्री रवींद्र चौबे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. ते सात वेळा आमदार राहिले आहेत. तर ईश्वर साहू पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मुलाच्या मृत्यूनंतर तत्कालीन काँग्रेस सरकारने 10 लाख रुपये आणि सरकारी नोकरीची ऑफर दिली होती, परंतु ईश्वर साहू यांनी ही मदत नाकारली होती.


छत्तीसगड मध्ये खेळ उलटला; काँग्रेसला मागे सारून भाजपची बाजी!!


विजयानंतर काय म्हणाले ईश्वर साहू?

काँग्रेसचे रवींद्र चौबे यांचा निवडणुकीच्या मैदानात पराभव केल्यानंतर ईश्वर साहू म्हणाले की, मी पराभव केला नाही, सजा विधानसभा मतदारसंघातील जनतेने त्यांचा पराभव केला आहे. आता संघटनेतील जबाबदारी मी पार पाडेन.

ईश्वर साहू यांच्या विजयावर भाजप नेते कपिल मिश्रा म्हणाले, “जिहादी व्यवस्थेला आणि काँग्रेसच्या पापांना जनतेने दिलेले हे उत्तर असल्याचे म्हटले आहे.

Chhattisgarh Result Ishwar Sahu who lost his son in violence defeated the Congress minister fighting on BJP ticket

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात