विशेष प्रतिनिधी
रायपूर : लोकसभेच्या सेमी फायनल निवडणुकांमध्ये एक्झिट पोलनी व्यक्त केलेला सर्व अंदाज फेल गेला. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस जिंकेल आणि भाजपला फटका बसेल, असा एक्झिट पोलचा दावा फसला. त्यातही छत्तीसगडमध्ये तर खेळ पूर्णपणे उलटला आहे. छत्तीसगडमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये काँग्रेसने भाजपवर आघाडी घेतली होती, पण आता निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार बाजी पलटत असून भाजपने काँग्रेसवर आघाडी घेतली आहे.Game turned in Chhattisgarh; BJP’s victory by pushing back the Congress!!
छत्तीसगड विधानसभेच्या 90 जागांपैकी 47 जागांवर भाजपा आघाडीवर आहे याचा अर्थ भाजपने बहुमताचा आकडा पूर्ण गाठला आहे, तर काँग्रेस 42 जागांवर आघाडीवर आहे.
मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा हा वैयक्तिक पराभव मानण्यात येत आहे. त्यांनी आपल्याच मंत्रिमंडळातले उपमुख्यमंत्री टी. एस. सिंगदेव यांचे राजकीय पंख छाटण्याचा प्रयत्न केला. त्याचा उलटा परिणाम बघेल यांना भोगावा लागल्याचे बोलले जात आहे. भूपेश बघेल यांच्याविरुद्ध आमदारांमध्ये असंतोष होता. परंतु त्या असंतोषाकडे काँग्रेस हायकमांडने दुर्लक्ष केले. टी. एस. सिंगदेव यांची राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण केली नाही. भूपेश बघेल हा एकमेव चेहरा काँग्रेसने छत्तीसगड मधल्या जनतेसमोर ठेवला त्याचा दुष्परिणाम निवडणुकीत दिसला.
या कोणत्याही राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपने एकाही नेत्याला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून समोर केले नव्हते. वास्तविक प्रत्येक राज्यात भाजपचा एक मोठा चेहरा स्वतंत्रपणे जनतेसमोर होता. मध्य प्रदेशात विद्यमान मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, छत्तीसगडमध्ये रमण सिंह आणि राजस्थानत वसुंधरा राजे हे आधीच मुख्यमंत्री राहिले होते. परंतु यापैकी कोणाचाही चेहरा भाजपने मुख्यमंत्रीपदासाठी पुढे केलेला नव्हता. छत्तीसगडमध्ये याचा भाजपला तोटा होईल असे सुरुवातीला बोलले जात होते. परंतु, भाजपने नियोजनपूर्वक लढाई खेळत काँग्रेसच्या वेगवेगळ्या बालेकिल्ल्यांवर हल्लेबोल केले आणि भूपेश बघेल यांचे नेतृत्व नामोहरम करून दाखवले.
#WATCH रायपुर: छत्तीसगढ़ के पूर्व मुख्यमंत्री रमन सिंह ने कहा, "जनता ने प्रधानमंत्री मोदी की गारंटी पर भरोसा किया है, भूपेश बघेल की बातों पर भरोसा नहीं किया। प्रथम चरण के रुझान में ये स्पष्ट दिख रहा है। निश्चित रूप से भाजपा के राष्ट्रीय नेतृत्व का आशीर्वाद मिला है…" pic.twitter.com/HuG81qxvOA — ANI_HindiNews (@AHindinews) December 3, 2023
#WATCH रायपुर: छत्तीसगढ़ के पूर्व मुख्यमंत्री रमन सिंह ने कहा, "जनता ने प्रधानमंत्री मोदी की गारंटी पर भरोसा किया है, भूपेश बघेल की बातों पर भरोसा नहीं किया। प्रथम चरण के रुझान में ये स्पष्ट दिख रहा है। निश्चित रूप से भाजपा के राष्ट्रीय नेतृत्व का आशीर्वाद मिला है…" pic.twitter.com/HuG81qxvOA
— ANI_HindiNews (@AHindinews) December 3, 2023
काँग्रेसमध्ये नाराज असलेली टी. एस. सिंगदेव हे केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या संपर्कात गेल्या काही दिवसांपासून होते. छत्तीसगडमध्ये त्यामुळेच मोठा “खेळ” होणार आणि भूपेश बघेल यांचा करेक्ट कार्यक्रम होणार, अशी भाजपच्या अंतर्गत राजकीय वर्तुळात चर्चा होती. परंतु ही चर्चा काँग्रेस हायकमांड पर्यंत पोहोचूनही त्याकडे काँग्रेस हायकमांडने दुर्लक्ष केले. त्याचा परिणाम सेमी फायनल निवडणुकीत काँग्रेसला भोगावा लागला.
काँग्रेसला मध्य प्रदेशात सत्ता खेचून घेता आली नाही. राजस्थानातली सत्ता गमवावी लागली आणि छत्तीसगडमध्ये पिछाडीवर जावे लागले. तेलंगणात मिळालेली सत्ता ही प्रादेशिक पक्षाला हरवून मिळवली असल्यामुळे भाजपला हरविल्याचा आनंद देखील काँग्रेसला मिळवता आला नाही. उलट काँग्रेसला आता “इंडिया” आघाडीत प्रादेशिक पक्षांचा रोष सहन करावा लागणार आहे आणि प्रादेशिक पक्षांना “इंडिया” आघाडीत राहायचे असेल तर काँग्रेसचे वर्चस्व सहन करावे लागणार आहे.
छत्तीसगढ़ चुनाव 2023: चुनाव आयोग के अनुसार बीजेपी 50 और कांग्रेस 38 सीट से आगे चल रही है। pic.twitter.com/G1lOf8Cmq3 — ANI_HindiNews (@AHindinews) December 3, 2023
छत्तीसगढ़ चुनाव 2023: चुनाव आयोग के अनुसार बीजेपी 50 और कांग्रेस 38 सीट से आगे चल रही है। pic.twitter.com/G1lOf8Cmq3
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more