हातात दगड, पण सरकारच्या प्रस्तावावर शेतकरी सहमत; लेखी हमी मागितली!!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : हातात दगड, रस्त्यावर गदारोळ, पण सरकारच्या प्रस्तावावर शेतकरी सहमत!!, असे शेतकरी आंदोलनाचे आजचे चित्र आहे.Stone in hand, but farmers agree to the government’s proposal; WRITTEN GUARANTEE ASKED!!

गुरुवारी रात्री उशिरापर्यंत सुरू असलेली केंद्र आणि शेतकरी नेत्यांमधील चर्चा अनिर्णीत राहिली तरी रविवारच्या बैठकीत तोडग्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तिसऱ्या फेरीच्या बैठकीत केंद्राने शेतकरी नेत्यांसमोर काही प्रस्ताव ठेवले, ज्यामध्ये सरकार त्यांच्या विविध मागण्या कशा सोडवणार हे सांगितले आहे. त्यात केंद्राने शेतकऱ्यांना वीज बिल आणि प्रदूषण बिलातून वगळण्याचे आश्वासन दिले. कर्जमाफीचे आश्वासनही दिले, परंतु प्रकरण एमएसपीवरच अडलेे.



गहू आणि तांदूळ ही दोन मुख्य पिके एमएसपीवर खरेदी केली जात आहेत. हरियाणा-पंजाबमध्ये उसाचे भाव सर्वाधिक आहेत. परंतु, शेतकरी सर्व पिकांसाठी एमएसपी हमी देण्याच्या मागणीवर ठाम राहिले. या विषयावर मंत्र्यांनी नव्याने समिती स्थापन करून त्यात शेतकरी नेत्यांच्या समावेशाचा प्रस्ताव मांडला. यापूर्वीही समिती स्थापन केल्याचे शेतकरी नेत्यांनी सांगितले. केंद्रीय मंत्र्यांनी समितीची रूपरेषा आणि झटपट निर्णय घेण्याची क्षमता सांगितल्यावर शेतकरी नेते सहमत असल्याचे दिसले. शेतकरी नेत्यांनी केंद्रीय मंत्र्यांना विचारले की, तुम्ही आणलेला प्रस्ताव व्यावहारिकदृष्ट्या कसा शक्य आहे, हे आम्हाला सांगा आणि आम्हालाही याबाबत लेखी आश्वासन हवे आहे. यावर केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, सरकारी पातळीवर याला अंतिम स्वरूप देण्यास काही कालावधी लागू शकतो. त्यामुळे रविवारी सायंकाळी नव्याने बैठक होणार आहे. आता केंद्रीय मंत्री रविवारी लेखी आश्वासन आणि ते पूर्ण करण्यासाठीचा रोडमॅप घेऊन आले तर तोडगा निघण्याची शक्यता दिसत आहे.

दोन्ही बाजूंनी चांगले संकेत मिळत आहेत

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, शेतकऱ्यांशी सकारात्मक चर्चा झाली आहे. पुढील चर्चा सकारात्मक वातावरणात होऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याच्या दिशेने वाटचाल करू. दुसरीकडे, पहिल्या दोन फेऱ्यांपेक्षा चर्चेची तिसरी फेरी अधिक सकारात्मक झाल्याचे शेतकरी नेत्यांनी सांगितले. प्रत्येक मागणीवर मंत्र्यांनी प्रस्ताव आणि उपाय आणले होते. मात्र मंत्र्यांच्या प्रस्तावांची अंमलबजावणी कशी होईल याबाबत साशंकता असल्याने व्यावहारिक तोडग्यासाठी आम्ही आराखडा आणि लेखी आश्वासन मागितले आहे.

भारत बंदचा परिणाम पंजाब आणि हरियाणात दिसला. एक-दोन जिल्हे वगळता पंजाब बंद राहिला. पंजाबमध्ये सरकारी आणि खासगी बसेसही धावल्या नाहीत. हरियाणातील शेतकऱ्यांनी ३ तास ​​टोलनाके फ्री ठेवले.

आंदोलनाच्या चौथ्या दिवशी हृदयविकाराने १ शेतकरी व १ पोलिसाचा मृत्यू. मृत शेतकरी ज्ञानसिंह गुरुदासपूरचे आहेत. पोलिस हिरालाल पानिपत समलखा जीआरपी पोस्टवर कार्यरत होते.

एमएसपी हमीसह १३ मागण्यांवर शेतकरी आणि केंद्रातील चर्चेच्या तिसऱ्या फेरीचा परिणाम शुक्रवारी शंभू सीमेवर दिसला. तरुण बॅरिकेड्सकडे सरकले असता पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

Stone in hand, but farmers agree to the government’s proposal; WRITTEN GUARANTEE ASKED!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात