उपेंद्र कुशवाह यांनी पक्षासाठी सहा नावे निवडणूक आयोगाकडे पाठवली होती
विशेष प्रतिनिधी
पाटणा : बिहारच्या राजकारणातून आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह आता त्यांच्या नव्या पक्षासोबत २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवताना दिसणार आहेत. निवडणूक आयोगाने उपेंद्र कुशवाह यांच्या पक्षाचे नाव बदलले आहे. आता त्यांच्या पक्षाचे नाव बदलून राष्ट्रीय लोक मोर्चा असे करण्यात आले आहे. खुद्द उपेंद्र कुशवाह यांनी ही माहिती मीडियाला दिली आहे.New name of Upendra Kushwaha’s party approved by Election Commission
बिहारमधील उपेंद्र कुशवाह यांचा पक्ष राष्ट्रीय लोक जनता दल आता राष्ट्रीय लोक मोर्चा म्हणून ओळखला जाईल. याबाबत निवडणूक आयोगाने त्यांच्या पक्षाच्या नावाची नोंदणी केली. उपेंद्र कुशवाह यांनी पक्षासाठी सहा नावे निवडणूक आयोगाकडे पाठवली होती, त्यापैकी निवडणूक आयोगाने राष्ट्रीय लोक मोर्चाला संमती दिली आहे.
निवडणूक आयोगाकडून राष्ट्रीय लोक मोर्चाला संमती मिळाल्यानंतर उपेंद्र कुशवाह यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, आम्ही राष्ट्रीय लोक मोर्चा अंतर्गत बिहारमधील लोकसभेच्या 40 जागांसाठी तयारी करत आहोत. आमचा पक्ष किती जागा लढवणार हे अद्याप ठरलेले नाही
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App