राजदसोबत युती आणि दलितांवरील अत्याचाराचा आरोप करत त्यांनी हल्लाबोल केला आहे.
विशेष प्रतिनिधी
पाटणा : बिहारमधील जेडीयूचे माजी आमदार आणि सध्याचे प्रदेश उपाध्यक्ष लालन पासवान यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राजदसोबत युती आणि दलितांवरील अत्याचाराचा आरोप करत त्यांनी हल्लाबोल केला आहे. राजीनाम्यात त्यांनी आरजेडीचे वर्णन बिहारमध्ये दहशत आणि गुंडा राजवट प्रस्थापित करणारा पक्ष असे केले आहे. Big shock to Nitish Kumar JDU state vice president Lalan Paswan resigns
पक्षाध्यक्षांना पाठवलेल्या पत्रात लालन पासवान लिहितात, “बिहारमध्ये दहशत आणि गुंडा राजवट प्रस्थापित करणाऱ्या लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी झालेल्या तडजोडीनंतर दलितांवर हत्या, बलात्कार आणि छळाच्या घटना वाढत आहेत. त्याचा प्रतिबंधासाठी कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ, मी जनता दल (यू) च्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे.”
गेल्या महिन्यात राष्ट्रीय लोक जनता दल (आरएलजेपी) प्रमुख उपेंद्र कुशवाह यांनी जेडीयूमध्ये फूट पडणार असल्याचा दावा केला होता. जरी ते एकाच वेळी तुटले नाही तरी त्याचे तुकडे तुकडे होऊ शकतात, परंतु ते तुटणे निश्चित आहे. असं ते म्हणाले होते. यानंतर काही वेळातच जेडीयूचे ज्येष्ठ नेते आणि माजी विधान परिषद सदस्य रणवीर नंदन यांनी पक्षाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App