शरदनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी छगन भुजबळांचे आरोप फेटाळून लावताना स्वतःच्या “बोअरिंग” जीवनातले एक “रहस्य” सांगितले. आपण रोज डायरी लिहितो आणि त्यातली काही पाने छगन भुजबळांनी उल्लेखित केलेल्या आरोपांसंदर्भातली आहेत, असे सांगून सुप्रिया सुळे यांनी भुजबळांचे सगळे आरोप त्याआधारे खोडून काढले. Supriya sule’s diary : will it reveal some more hidden secrets in maharashtra??
मराठी माध्यमातल्या सगळ्या बातम्या सुप्रिया सुळेंनी भुजबळांचे आरोप खोडून काढले, या विषयावर केंद्रित झाल्या. पण त्यातली महत्त्वाची माहिती, ती म्हणजे सुप्रिया सुळे शालेय जीवनापासून रोज डायरी लिहितात, ही बातमी मात्र काहीशी झाकोळली गेली. पण सुप्रिया सुळे यांच्या डायरीत अशी कोणती “रहस्ये” दडली आहेत, की ज्यातून महाराष्ट्राचे राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक आत्मचरित्र नव्हे; पण निदान महाराष्ट्राचे आत्मपॅम्प्लेट तरी लिहिले जाऊ शकेल??
कारण महाराष्ट्रातल्या अनेक राजकीय नेत्यांनी आत्मचरित्र लिहिली आणि ती गाजली, पण ते बहुतांश नेते महाराष्ट्रव्यापी आणि देशव्यापी नेतृत्व करणारे होते. यशवंतराव चव्हाण यांचे कृष्णाकांठ असो किंवा शरद पवारांचे लोक माझे सांगाती असो ही आत्मचरित्रे खूप गाजली आणि महाराष्ट्राच्या राजकीय कार्यकर्त्यांसाठी ती मार्गदर्शक ठरली.
अर्थात सुप्रिया सुळे या जरी रोज डायरी लिहीत असल्या, तरी त्यांनी अजून आत्मचरित्र लिहिण्याची घोषणा केलेली नाही. शिवाय आजही सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व स्वतः शरद पवार यांच्या छत्रछायेखालचे असल्यामुळे त्या नेतृत्वाची “महाराष्ट्रव्याप्ती” अजून “विस्तारायची” आहे. त्यामुळे त्यांनी लिहिलेली डायरी, तिच्यातले तपशील नेमके काय आहेत??, हे जरी गुलदस्त्यात असले तरी त्यात महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक घटनांचे धागेदोरे असणार हे निश्चित!!
सुप्रिया सुळे यांनी आपण डायरी लिहितो हे सांगताना आपले जीवन खूप “बोअरिंग” असल्याचा खुलासा केला. त्यामुळे त्या डायरीत कोणतेही गौप्यस्फोट असणार नाहीत, असेही त्या म्हणाल्या.
… पण हरकत नाही. त्यात कदाचित कोणते मोठे गौप्यस्फोट नसतीलही, पण स्वतः सुप्रिया सुळे यांच्या जीवनातल्या विशिष्ट घटना आणि घडामोडी यांचा धांडोळा तर निश्चित असेल!! म्हणजे सुप्रिया सुळे यांच्या डायरीतून यशवंतराव चव्हाण किंवा शरद पवार यांच्यासारखे विस्तृत आत्मचरित्र होणार नाही, त्यामुळे त्यात अवघ्या महाराष्ट्राचे राजकीय – सामाजिक डावपेचात्मक प्रतिबिंब कदाचित पडणार नाही, पण निदान महाराष्ट्राचे आत्मपॅम्फ्लेट काढण्याइतपत तर मजकूर निश्चितच असू शकेल ना!!
महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही कलात्मक सिने जगतात सध्या आत्मपॅम्फ्लेट हा सिनेमा गाजतो आहे. एका सामान्य माणसाचे “आत्मचरित्र” असून – असून किती मोठे असणार??, तर ते एक पॅम्फ्लेट काढण्याएवढेच असणार!!, हाच या चित्रपटाचा आशय आहे.
मग सुप्रिया सुळे या तर सार्वजनिक जीवनात वापरणाऱ्या व्यक्ती आहेत, त्यामुळे त्यांचे वैयक्तिक जीवनातली डायरी ही सध्यापुरते त्यांचे वैयक्तिक “आत्मचरित्र” होऊ शकेल, पण महाराष्ट्रासाठी मात्र त्याचे संदर्भमूल्य सध्या तरी महाराष्ट्राच्या आत्मपॅम्फ्लेट एवढे असेल का?? त्यामध्ये शरद पवार – दाऊद संबंध, शरद पवार – लवासा संबंध, शेतीतून कोट्यावधी रुपयांचे उत्पन्न काढण्याची युक्ती याविषयीच्या काही खुलासे किंवा टिप्स सुप्रिया सुळे यांच्या डायरीत आहेत का??, कारण तसे तपशील असतील, तर त्याचे संदर्भमूल्य महाराष्ट्राच्या आत्मपॅम्फ्लेट एवढे तर नक्की मोठे असेल!!*
त्यामुळे सुप्रिया सुळे यांचे जीवन जरी त्यांच्या म्हणण्यानुसार “बोअरिंग” असले, त्यांची डायरी आणि त्यातले तपशील महाराष्ट्राच्या तमाम जनतेसाठी खुले होणे आवश्यक आहे. पण महाराष्ट्राच्या आत्मपॅम्फ्लेट साठी सुप्रिया सुळे या आपली डायरी उपलब्ध करून देतील का??… कारण महाराष्ट्रातले तमाम पुरोगामी राजकीय – ऐतिहासिक संशोधनकर्ते ही डायरी वाचण्यासाठी उत्सुक आणि इच्छुक आहेत!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App