विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : बँकानी ठरविलेल्या किमतीपेक्षा जास्त किमतीने आम्ही सहकारी साखर कारखाने विकत घेतले आहेत, असे जर कोण म्हणत असेल तर ही दरोडेखोरांनी निर्लज्जपणाने दिलेली कबुली आहे, असा टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी लगावला. Buying sugar factories at high prices; This is the call of robbers: Raju Shetty
सातारा जिल्ह्यातील कर्जबाजारी झालेला जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यातील गैरव्यवहार मुद्यावर आणि ईडीने केलेली कारवाई या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातलगाने हा कारखाना कमी किमतीत खरेदी करून बळकावल्याचा आरोप शालिनीताई पाटील यांनी केला होता.
अशा प्रकारे बळकावलेले सर्व साखर कारखान्यांचे पुर्नमुल्याकंन करावे. अशी मागणी शेट्टी यांनी केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App