वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पोस्ट खाते आता अस्थी विसर्जन करणार आहे. तसेच गंगाजलही संबधिताना मिळणार आहे. Bone immersion will account at Kashi, Prayag, Haridwar and Gaya; You will also get Gangajal
गंगेत अस्थिविसर्जन करण्याची प्रथा हिंदू धर्मात आहे. त्यामुळे काशी, प्रयाग, हरिद्वार आणि गया येथे अस्थी विसर्जन करण्याची सोय टपाल खात्याने दिली आहे.
स्पीड पोस्टाने अस्थी पाठविता येणार असून तीर्थक्षेत्री त्याचे विसर्जन तसेच विधी मृताच्या कुटुंबाला लाईव्ह बघता येणार आहे. याशिवाय मृताच्या कुटुंबाला एक बाटली गंगाजलही टपाल खात्याच्या वतीने देण्यात येणार आहे.
ओम दिव्यदर्शन संस्थेच्या माध्यमातून हे अस्थी विसर्जन करण्यात येणार आहे. टपाल संचालक व वाराणसी विभागाचे पोस्टमास्तर जनरल कृष्णकुमार यादव यांच्या पुढाकाराने ही योजना सुरू केली असून, सध्या प्रायोगिक तत्त्वावर फक्त चारच ठिकाणी ही सोय करून देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App