ओबीसी आरक्षणाच्या आंदोलनातून भुजबळांचे राजकारण, समता परिषदेला सक्रीय करत राष्ट्रवादीवर दबाव


राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले असले तरी या निमित्ताने पुन्हा एकदा ओबीसी राजकारण खेळण्याची तयारी महाविकास आघाडीतील मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. समता परिषदेतला पुन्हा एकदा सक्रीय करून राष्ट्रवादीवर दबाव आणण्याची खेळीही यातून केली जात आहे. Bhujbal’s politics from OBC reservation movement, pressure on NCP by activating Samata Parishad


विशेष प्रतिनिधी

नाशिक : राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले असले तरी या निमित्ताने पुन्हा एकदा ओबीसी राजकारण खेळण्याची तयारी महाविकास आघाडीतील मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. समता परिषदेतला पुन्हा एकदा सक्रीय करून राष्ट्रवादीवर दबाव आणण्याची खेळीही यातून केली जात आहे.

मुंबईत ओबीसी संघटनांची बैठक घेतल्यावर आरक्षणाच्या राजकारणावरून भुजबळ यांनी आपली वेगळी चूल मांडली आहे. नाशिकमध्ये समता परिषदेने रास्ता रोको करत आंदोलन केले. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्त्वात या आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. ओबीसी आरक्षण वाचवा यासाठी आक्रोश आंदोलन करण्यात आलं. सध्या या आंदोलनासाठी स्वत: छगन भुजबळ हे रस्त्यावर उतरले नसले, तरी त्यांच्याच नेतृत्त्वात हे आंदोलन होत आहे. दोन दिवसापूर्वी ओबीसी संघटनांच्या बैठकीत याबाबतचा निर्णय झाला. नाशिकमधील भुजबळ फार्मवर झालेल्या बैठकीत यावर एकमत झाले. त्यानुसार पहिले आंदोलन नाशिकमध्ये करण्यात आले आहे.महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी सुमारे दीड वर्षांहून अधिक काळ छगन भुजबळ हे तुरुंगात होते. अद्यापही जामीनावरच आहे. ईडीकडून त्यांची चौकशी सुरूच आहे. तरीही गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी कॉँग्रेसने त्यांना मंत्रीपद दिले. याला राष्टÑवादीतील काही नेत्यांचा विरोध आहे. भविष्यात त्यांच्याकडून काही दगाफटका होऊ नये यासाठी भुजबळ यांनी पुन्हा एकदा ओबीसी राजकारणाचा मार्ग अवलंबला आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या निर्णयाने त्याला निमित्त मिळाले आहे.

शिवसेनेतून राष्ट्रवादीत आल्यापासूनच आक्रमक नेते अशी भुजबळांची प्रतिमा राहिली आहे. त्यामुळे राष्टÑवादी कॉँग्रेसमध्ये त्यांना वेळोवेळी मोठी पदे मिळाली. दोन वेळा उपमुख्यमंत्रिपदाची संधी, गृह, सार्वजनिक बांधकाम यासारखी महत्वाची खाती मिळाली. पण नंतर स्वपक्षातूनच त्यांचे पंख छाटण्यास सुरुवात झाली. प्रथम उपमुख्यमंत्रिपदावर पाणी सोडावे लागले. यामागे अजित पवार यांचा हात असल्याची चर्चाही नेहमी होत असते. तुरुंगातून सुटलेल्या भुजबळ यांना मंत्रीपद देण्यास अजित पवार यांचा विरोध होता. परंतु, राज्यात पहाटेच्या शपथविधीनंतर घडलेल्या राजकारणात अजित पवार यांचा शब्द चालला नाही. मात्र, कधीही आपल्याला धक्का बसू शकतो याची भुजबळांना कल्पना आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या राजकारणाचा जुना फॉर्म्युलाच पुढे नेण्याचे ठरविले आहे.

भुजबळांनी समता परिषदेच्या माध्यमातून राज्यभर आपल्या कार्यकर्त्यांचे जाळे तयार केले आहे. गेल्या पाच वर्षांतील राजकीय विजनवास आणि दीड वर्षांचा तुरुंगवास यामुळे समता परिषदांचे काम थंडावले होते. त्याला एक प्रकारची चालना आता ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने मिळाली आहे. त्यामुळे समता परिषदांच्या राज्यभरातील शाखा कार्यान्वित करून राष्ट्रवादीवर दबावगट म्हणून काम करण्याचे भुजबळांनी ठरविल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर ओबीसी एकतेच्या झेंड्याखाली इतर पक्षांतील लोकांशीही चर्चा करून राजकीय संधी मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

Bhujbal’s politics from OBC reservation movement, pressure on NCP by activating Samata Parishad

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    India’s Cheapest Electric Car Launched Tata Tiago EV From Just 8.49 Lakhs; वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती