भारतीय वंशाच्या सत्या नाडेला यांना बढती, मायक्रोसॉफ्टच्या अध्यक्षपदी नेमणूक

Indian Origin Satya Nadela Became Chairman Of Microsoft

Satya Nadela : भारतीय वंशाचे मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्य नाडेला यशाची शिडी चढत आहेत. आता दिग्गज तंत्रज्ञान कंपनी मायक्रोसॉफ्टने त्यांना अध्यक्षपदी नेमणूक केली आहे. नाडेला हे आता जॉन थॉम्पन यांची जागा घेणार आहेत. Indian Origin Satya Nadela Became Chairman Of Microsoft


वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : भारतीय वंशाचे मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्य नाडेला यशाची शिडी चढत आहेत. आता दिग्गज तंत्रज्ञान कंपनी मायक्रोसॉफ्टने त्यांना अध्यक्षपदी नेमणूक केली आहे. नाडेला हे आता जॉन थॉम्पन यांची जागा घेणार आहेत.

विशेष म्हणजे, सत्य नाडेला 2014 मध्ये मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बनले. यानंतर, लिंक्डइन, न्युअन्स कम्युनिकेशन्स आणि झेनीमॅक्स सारख्या अनेक कंपन्यांच्या अब्जावधी डॉलरच्या अधिग्रहणामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका होती.

काय म्हटले कंपनीने?

थॉम्पसन आता प्रमुख स्वतंत्र संचालक म्हणून राहतील, असे कंपनीने निवेदनात म्हटले आहे. 2014 मध्ये बिल गेट्सनंतर थॉम्पसन मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष झाले.

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यापुढे कंपनीच्या बोर्डवर नसतील. ते बिल आणि मेलिंडा गेट्स यांच्या परोपकारी कार्यांवर लक्ष केंद्रित करत आहेत. कंपनीने अलीकडेच प्रति शेअर 56 सेंटचा तिमाही लाभांश देण्याचे ठरवले आहे.

मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्य नाडेलाही भारतातल्या कोरानामुळे झालेल्या विध्वंसमुळे खूप दु:खी झाले होते. या परिस्थितीत मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

हैदराबादेत शालेय शिक्षण

सत्य नाडेला यांचा जन्म 1967 मध्ये हैदराबाद येथे झाला. त्यांचे वडील प्रशासकीय अधिकारी आणि आई संस्कृत व्याख्याता होत्या. हैदराबाद पब्लिक स्कूलमधून प्रारंभिक शिक्षण घेतल्यानंतर 1988 मध्ये त्यांनी मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले.

यानंतर ते संगणकशास्त्रात एमएस करण्यासाठी अमेरिकेत गेले. त्यांनी 1996 मध्ये शिकागोमधील बूथ स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीए केले.

Indian Origin Satya Nadela Became Chairman Of Microsoft

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात