मुंबईतून बॉलिवूड न्यायला आलोच नाही; यूपीत वर्ल्ड क्लास फिल्म सिटी बनवायचीय, योगींचे प्रत्युत्तर


विशेष प्रतिनिधी

मुंबई : “आम्ही मुंबईतून बॉलिवूड न्यायला थोडीच आलोय?, आम्हाला यूपीत वर्ल्ड क्लास फिल्म सिटी बनवायची आहे. आम्हाला सगळे नवीनच उभारायचे आहे. ही खुली स्पर्धा आहे. जो चित्रपटसृष्टीला नव्या काळानुसार नव्या आणि अधिक सुविधा देतील, तिकडे चित्रपटसृष्टी जाईल. आम्ही संकुचित विचार करत नाही. मोठा आणि वेगळा विचार करतो, तुम्हीही तसाच मोठा विचार करा,” असा टोला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ठाकरे – पवार सरकारला लगावला. yogi adityanath news

योगींच्या बॉलिवूड दौऱ्यावरून शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे या सगळ्या पक्षांनी जोरदार हल्लाबोल केला होता. त्याला योगींनी मुंबईतील पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले. योगींनी आपल्या वक्तव्यातून नव्या गरजा, नव्या सुविधा, खुली स्पर्धा, वर्ल्ड क्लास आदी शब्दांचा उपयोग करून बॉलिवूडचे यूपीला काही नको असल्याचेच सूचित केले. बॉलिवूडपेक्षा वेगळे आणि मोठे चित्रपट विश्व उभारण्याची महत्त्वाकांक्षा योगींनी बोलून दाखविली. yogi adityanath news

तत्पूर्वी, योगींनी अक्षयकुमारसह बॉलिवूडमधील दिग्गजांशी आणि उद्योग जगतातील दिग्गजांशी चर्चा केली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत योगींना मुंबईतील फिल्म इंडस्ट्रीविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना योगी आदित्यनाथ म्हणाले, की आम्ही मुंबईतून काहीही कुठेही घेऊन जाणार नाही. मुंबईतील फिल्म सिटी मुंबईतच काम करणार आहे.

आम्हाला नवी फिल्म सिटी उभारायची आहे. येथील दिग्गजांचा अनुभव ऐकणे, त्यांच्याशी विचारविनिमय करून त्यांच्या अनुभवाचा उपयोग करून घेणे यासाठी मी येथे आलो आहे. नव्या वातावरणानुसार, नव्या गरजांनुसार उत्तर प्रदेशात आम्ही नवीन वर्ल्ड क्लास फिल्म सिटी उभी करणार आहोत,” असे म्हणत योगी यांनी ठाकरे – पवार सरकारला टोला लगावला.

मागील काही दिवसांपासून उत्तर प्रदेशात फिल्म सिटी उभारण्यात येणार असल्याची चर्चा सुरू होती. अखेर मुंबई दौऱ्यात योगींनी आज त्याची अधिकृत घोषणा केली. सिनेसृष्टीतील निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांच्या भेटीनंतर योगींनी ही मोठी घोषणा केली. यावेळी ठाकरे – पवार सरकार आणि शिवसेनेने केलेल्या टीकेवरही योगींनी प्रत्युत्तर दिले.

yogi adityanath news

ते म्हणाले, की उत्तर प्रदेशात आम्ही जागतिक दर्जाची फिल्मसिटी उभारण्याचे प्रयत्न करीत आहोत. या क्षेत्रातील दिग्गज कलाकार, दिग्दर्शक, निर्माते अशा सर्व जाणकारांशी चर्चा झाली आहे. नोएडाजवळ यमुना प्राधिकरणाजवळ ही सिनेसृष्टी उभी राहील. आशियातील सर्वात मोठे विमानतळ असलेल्या जेवर विमानतळाजवळील १ हजार हेक्टरपेक्षा अधिक जागेवर ही फिल्म सिटी उभी करणार आहोत. या ठिकाणाहून उत्तर प्रदेशसह आणि देशातील इतर भागांशी जोडणारी दळणवळणांची सर्व साधने असतील. सिनेसृष्टीतील कलाकारांनीही यासाठी रस दाखवला आहे. त्यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात