मतदारसंघाचा विकास सोडून ट्रम्प – बायडेनकडे लोकांचे लक्ष; रोहित पवारांना राम शिंदेचा टोला


विशेष प्रतिनिधी

पुणे : आपल्या मतदारसंघातील कामे सोडून काही लोकांचे अमेरिकेतल्या ट्रम्प – बायडेन यांच्याकडे लक्ष आहे. केंद्रात मोदी काय करतात, यावर बोलताहेत, असा टोला भाजपचे नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी आमदार रोहित पवारांना लगावला. रोहित पवार हे नेहमी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहांना सल्ले देणारी ट्विट करत असतात. जागतिक आणि भारताच्या अर्थव्यवस्थेविषयी भाष्य करतात, या राजकीय पार्श्वभूमीवर राम शिंदे यांनी रोहित यांना हा टोला लगावला आहे. ram shinde news

रोहित पवार यांच्या वर्षभराच्या कामगिरीबाबत तुम्ही त्यांना किती गुण द्याल? असा सवाल पत्रकारांनी राम शिंदे यांना विचारला असता राम शिंदे यांनी रोहित पवारांना टोला हाणला. ते म्हणाले, “मी त्यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढलो होतो. त्यांनी मला पराभूत करून येथून विजय मिळवला होता. त्यामुळे त्यांना गुण किती द्यायचे हे आता मी ठरवणार नाही.

कर्जत – जामखेडची जनताच आता त्याचा निर्णय घेईल. पण मतदारसंघातील विकासकामे करण्यापेक्षा लोकांचे ट्रम्प – बायडेनकडेच जास्त लक्ष दिसते. अमेरिकेत बायडेन यांचा विजय होताच. बायडेनच्या पावसात भिजण्याचा आणि शरद पवारांनी पावसात भिजण्याचा असे फोटो राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. त्याला उद्देशून देखील राम शिंदे यांनी टीका केली.

ते म्हणाले, “राज्यातील जनतेला जी आश्वासने दिली होती, ती आश्वासने सरकारने पूर्ण केली नाहीत. वर्षभरात भरपूर विकास करून दाखवतो असे ते म्हणाले. त्यांनी अनेक आमिषे दाखविली. पण वर्षभराच्या कालखंडात कोणतेही आश्वासन त्यांनी पूर्णच केले नाही. सध्या डोनाल्ड ट्रंप काय करतात? बायडन काय करतायत? बिहारच्या निवडणुकीमध्ये काय चाललं आहे? याकडेच ठाकरे – पवार सरकारमधील काही मंत्र्यांचे आणि आमदारांचे लक्ष आहे.

ram shinde news

अशा परिस्थितीत स्वत:च्या मतदारसंघात विकासाची कामे करायचे राहून जातेय”, असा खोचक टोला त्यांनी लगावला. राम शिंदे यांनी बऱ्याच दिवसांनी रोहित पवारांवर भाष्य करून आपण कर्जत – जामखेडकडे लक्ष ठेवून आहोत, असे निदर्शनास आणून दिले.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात