विशेष प्रतिनिधी
मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बॉलिवूडच्या सेलिब्रिटींची भेट ट्रायडंट हॉटेलमध्ये घेत असताना हॉटेलबाहेर राष्ट्रवादीच्या निदर्शनांचे नाट्य रंगत होते. राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण या परवानगीशिवाय काही महिला कार्यकर्त्यांसह निदर्शने करीत असताना मुंबई पोलिसांनी त्यांना अडवले. त्यावर विद्या चव्हाणांनी मुंबई पोलिसांशी जोरदार हुज्जत घातली. vidya chavan protested
उत्तर प्रदेशातील महिलांवरील अत्याचाराविरोधात योगींसमोर निदर्शने करण्यासाठी विद्या चव्हाण या राष्ट्रवादीच्या काही महिला कार्यकर्त्यांसह आल्या होत्या. परंतु, त्यांच्याकडे आंदोलनाची पोलिस परवानगी नव्हती, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
काही वेळ घोषणाबाजी केल्यानंतर पोलिसांनी विद्या चव्हाणांना आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. मुंबई पोलिस संविधान पाळत नाहीत. तुम्ही मुंबईचे पोलिस आहात की य़ूपीचे पोलिस अशी शेरेबाजी केली. पोलिस त्यांना आवरण्याचा प्रयत्न करून पोलिस व्हॅनमध्ये बसण्याची विनंती करीत होते.
परंतु, त्या ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हत्या. मुंबई पोलिस योगींच्या विरोधात आंदोनल करू देत नाहीत, असे त्यांचे म्हणणे होते. पोलिस बळाचा वापर करू शकत नाहीत. ते संविधान पाळत नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App