योगी आदित्यनाथांचा होळीनंतर शपथविधी


विशेष प्रतिनिधी

लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या दणदणीत विजयानंतर उत्तर प्रदेशचे कार्यकारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ रविवारी दिल्लीला जाणार आहेत. Yogi Adityanath sworn in after Holi



सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, योगी आदित्यनाथ तेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होळीपर्यंत पुढे ढकलला जाऊ शकतो, अशी माहिती मिळाली आहे. ती होळीनंतर होण्याची शक्यता आहे.

तत्पूर्वी, १० मार्च रोजी झालेल्या मतमोजणीत भाजप आघाडीने २७३ जागा जिंकून दणदणीत विजय नोंदवला होता. यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे राजीनामा दिला होता. मतदानाचा निकाल जाहीर झाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांची पंतप्रधान मोदींसोबतची ही पहिलीच भेट असेल.

Yogi Adityanath sworn in after Holi

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात