पुणे शहरात 300 एकरवर इंद्रायणी मेडिसिटी


विशेष प्रतिनिधी

मुंबई : पुणे शहरात 300 एकरवर इंद्रायणी मेडिसिटी उभारली जाईल. येथे सगळेच उपचार एका छताखाली मिळणार आहेत, अशी घोषणा उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पाचे वाचन करताना केली. नाशिक, मुंबई, नागपूरमध्ये वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण संस्था स्थापन करण्यात येणार.Indrayani Medicity on 300 acres in Pune city

वैद्यकीय प्रवेश संख्येत वाढ करण्यात येणार. देशातील होतकरू युवकांना इथेच वैद्यकीय शिक्षणाची संधी मिळण्यासाठी हा निर्णय घेतला. त्यानुसार नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठात वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण संस्था स्थापन करण्यात येणार आहे.8 कोटी रुपये खर्च करून 8 मोबाइल कर्करोग निदान वाहने सुरू करणे. सर्व जिल्‍ह्यांच्‍या ठिकाणी 100 खाटांची महिला रुग्‍णालय उभारणे, टाटा कॅन्सर संशोधन केंद्राला रायगड जिल्ह्यात खानापूरमध्ये जमीन देणे, प्रत्येक जिल्ह्यात टेलिमेडिसिन रुग्णालय उभारणे अशा आकर्षक घोषणा पवार यांनी केल्या. त्यासाठी 3 हजार 183 कोटींचा निधी दिला जाणार आहे. मुंबई येथे सेंट जॉर्ज येथे पदव्युत्तर शिक्षण व संशोधन संस्था आणि नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्था स्थापन करण्यात येणार आहे.

आरोग्य विषयक घोषणा –

आरोग्य सेवांवर आगामी तीन वर्षात 11 हजार कोटी खर्च करणार
नांदेड, अमरावती, जालना, भंडारा, अहमदनगर येथे ट्रामा केअर युनिट स्थापन करणार
ग्रामीण भागातील किडनीच्या रुग्णांसाठी लेप्रोस्कॉपी मोफत करण्यात येणार.यासाठी 17 कोटी 60 लाख रुपये खर्च करणार.
मोतिबिंदू उपचार पद्धती आधुनिकीकरण
कर्करोग उपचारासाठी 8 कोटी रुपये
अकोला येथे स्त्री रुग्णालयाची स्थापना करण्यात येणार
जालना येथे 365 खाटांचे मनोरुग्णालय स्थापन करण्यात येणार

Indrayani Medicity on 300 acres in Pune city

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी