आदर पूनावालांना धमक्या देणारा मुख्यमंत्री कोण? सोशल मीडियावर संताप


संपूर्ण भारताचे आशास्थान असलेले सीरम सीरम इंन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावला यांनी आपल्याला धमक्यांचे फोन येत असल्याचा आरोप केला आहे. त्यामध्ये त्यांनी एका मुख्यमंत्र्याचाही उल्लेख केला आहे. पूनावाला यांनी यामुळे वैतागून जाऊन लंडनमध्ये जाऊन राहण्याचा निर्णय घेतला आहे. पूनावाला यांना धमक्या देणारा मुख्यमंत्री कोण? असा सवाल सोशल मीडियावर केला जात आहे.Who is the Chief Minister who threatened Adar Poonawala? Anger on social media


विशेष प्रतिनिधी

मुंबई : संपूर्ण भारताचे आशास्थान असलेले सीरम सीरम इंन्स्टिट्यूट आॅफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावला यांनी आपल्याला धमक्यांचे फोन येत असल्याचा आरोप केला आहे.

त्यामध्ये त्यांनी एका मुख्यमंत्र्याचाही उल्लेख केला आहे. पूनावाला यांनी यामुळे वैतागून जाऊन लंडनमध्ये जाऊन राहण्याचा निर्णय घेतला आहे. पूनावाला यांना धमक्या देणारा मुख्यमंत्री कोण? असा सवाल सोशल मीडियावर केला जात आहे.



पुनावाला यांनी लंडन येथील टाईम्स यूकेला दिलेल्या एका मुलाखतीत आरोप करताना म्हटले होते की, देशात सध्या लसीचा मोठा तुडवडा भासत आहे. याच पार्श्वभूमीवर भारत देशातील काही ताकदवान नेते आणि व्यावसायिक फोन करुन धमकी देत असून त्यामध्ये अनेक मुख्यमंत्र्यांचादेखील समावेश आहे.

सर्वांकडून त्वरित कोविशिल्ड लसीचा पुरवठा करण्याची मागणी होत आहे. पूनावाला यांनी फोन कॉलचा संदर्भ देत सांगितले की, सर्व लोकांना वाटते की, लस सर्वप्रथम मला मिळावी. परंतु, लोकांनी अशाप्रकारे धमकी देणे समजण्यापलीकडे असल्याचे ते म्हणाले.

भारत देशात माझ्यावर लस पुरवण्याबाबत प्रचंड दबाव आहे. लोक अशी अपेक्षा करतील असे वाटले नव्हते. लोक फोन कॉलवर आम्ही त्यांना लस दिली नाही तर बरे होणार नाही असे सांगतात. परंतु, हा बोलण्याचा मार्ग नसून एकाप्रकारे धमकी असल्याचे ते म्हणाले.

ते पुढे सांगतात की, मी त्यांचे म्हणणे ऐकले नाही तर काय होऊ शकते ते समजावून सांगायचा प्रयत्न करतात. या घटनांमुळे आम्ही आमची कामे योग्य प्रकारे करू शकत नाही.

पूनावाला यांनी आरोप करूनही केंद्र सरकार आणि महाराष्ट्रचे सरकार गप्प का आहे? असा सवाल सोशल मीडियावर केला आहे. या प्रकरणाची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) किंवा राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) या प्रकरणाचा तपास करावा.

या प्रकरणी पूनावाला यांनी तक्रार दिली नसली तरी न्यायालयाने याबाबत सुओमुटो दखल घेऊन तपास करण्याचे आदेश द्यावेत. पूनावाला यांनी नाव घेतलेला मुख्यमंत्री कोण याचा तपास करावा, अशी मागणी होत आहे.

Who is the Chief Minister who threatened Adar Poonawala? Anger on social media

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात