अबब…आठवड्याचे भाडे ५० लाख रुपये, लंडनमध्ये आदर पूनावालांनी घेतला मॅन्शन

जगातील सर्वात मोठी लसउत्पादक कंपनी असलेल्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी लंडनमध्ये चक्क ५० लाख रुपये भाड्याने मॅन्शन घेतला आहे. Weekly rent Rs. 50 lakhs, Adar Poonawala took mansion in London


विशेष प्रतिनिधी

लंडन : जगातील सर्वात मोठी लसउत्पादक कंपनी असलेल्या सीरम इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी लंडनमध्ये चक्क ५० लाख रुपये भाड्याने मॅन्शन घेतला आहे.

ब्ल्यूमबर्गसने दिलेल्या वृत्तानुसार मेफेअर भागातील या मॅन्शनचे भाडे आठवड्याला ५० हजार पौंड आहे. लंडनच्या इतिहासातील हा सर्वाधिक महागडा भाडेकरार आहे.सुमारे २५ हजार चौरस फुट आणि शेजारी गेस्ट हाऊस असणारा हा मॅन्शन लंडनमधील साामन्य नागरिकांच्या घराच्या २४ पट क्षेत्रफळाचा आहे. सीरम इन्स्टिट्यूटच्या प्रवक्त्याने याबाबत काही बोलण्यास नकार दिला आहे. मेफेअर या लंडनच्या आलिशान भागातील घरांची भाडी कोरोना साथीमुळे ९.२ टक्यांनी घसरली आहे.

अदर पुनावाला हे डॉ. सायरस पुनावाला यांचे पूत्र आहेत. डॉ. सायरस यांनी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची स्थापना १९६६ साली केली होती. पुनावाला यांनी मुंबईत साडेसातशे कोटी रुपयांचे आलिशान घर खरेदी केली आहे. खरेदी केले आहे. भारतामधील सर्वात महागड्या प्रॉपटीर्पैकी एक हे घर असल्याचे म्हटले जाते. याशिवाय अदर पुनावाला यांचा पुण्यात २२ एकरमध्ये फार्महाऊस आहे.

Weekly rent Rs. 50 lakhs, Adar Poonawala took mansion in London

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*