आसाममध्ये या माणसाची साथ पडली कॉँग्रेसला महागात

आसाममध्ये कॉंग्रेसचा दारुण पराभव झाला. कॉँग्रेसच्या सरचिटणिस प्रियंका गांधी यांनी चहाच्या मळ्यात पाने वेचण्यापासून ते मंदिरांना भेटी देण्यापर्यंत अनेक हातकंडे वापरूनही आसाममधील जनतेने त्यांना नाकारले. पराभवामागे अनेक कारणे असली तरी एका माणसाची साथ कॉँग्रेसला महागात पडली.In Assam, this man’s support cost the Congress dearly


विशेष प्रतिनिधी

गुवाहाटी : आसाममध्ये कॉंग्रेसचा दारुण पराभव झाला. कॉँग्रेसच्या सरचिटणिस प्रियंका गांधी यांनी चहाच्या मळ्यात पाने वेचण्यापासून ते मंदिरांना भेटी देण्यापर्यंत अनेक हातकंडे वापरूनही आसाममधील जनतेने त्यांना नाकारले.

पराभवामागे अनेक कारणे असली तरी एका माणसाची साथ कॉँग्रेसला महागात पडली.नागरिकत्व संशोधक कायदा आणि इतर अनेक मुद्यांवर असलेल्या नाराजीचा वापर करून आपण सत्तेपर्यंत पोहोचू शकतो, असे कॉँग्रेसला वाटत होते.हे करताना त्यांनी एक चूक केली जी अत्यंत महाग पडली. कॉँग्रेसने खासदार बद्रुद्दीन अजमल यांच्या आॅल इंडिया युनायटेड डेमॉक्रॅटीक फंट या पक्षाबरोबर आघाडी केली. हिच गोष्ट भाजपासाठी गेमचेंजरठरली. भाजपाने शत्रू क्रमांक एक कॉँग्रेस नव्हे तर अजमल यांना मानले आणि त्यांच्यावर हल्ले करायला सुरूवात केली.

अत्यंत कट्टर धर्मांध असलेल्या या पक्षासोबत कॉँग्रेस आहे, याचा अर्थ हिंदूंच्या विरोधात आहे, हे पटवून देण्यात भाजपा यशस्वी झाला. निवडणूक निकालांनी त्यावर शिक्कामोर्तब केले.

आसाममध्ये नागरिकत्व संशोधन कायदा (सीएए) आणि एनआरसीला कडाडून विरोध करणारा हा पक्ष आहे. बंगाली भाषा बोलणारे मुस्लिम ही या पक्षाची व्होटबॅँक आहे. लोअर आसाम आणि बराक व्हॅली या भागात त्यांचे प्राबल्य आहे.

सत्ताधारी भाजपनं आपली हिंदुत्वाची धार तीव्र करण्यासाठी या मुस्लिमधार्जिण्या अजमल यांना लक्ष्य केले. शत्रू नंबर एक ठरवून आपला प्रचार तीव्र केलाय आणि काँग्रेस आमच्या खिजगणतीतही नाही असा मेसेजही दिलाय.

बद्रुद्दीन अजमल यांनी 2005 साली या पक्षाची स्थापन केली. अजमल यांचे मुस्लिमांसाठी विविध ट्रस्ट आणि संघटनांच्या मार्फत आधीच काम सुरु होते. मात्र, त्यामुळे केवळ मुस्लिमधार्जिणा पक्ष असल्याची त्यांची प्रतिमा झाली.

जमियत उलेमा-ए-हिंद या राष्ट्रीय संघटनेचे ते आसामचे प्रदेशाध्यक्षही आहेत. त्यामुळं तर त्यांच्यावर जातीयवादाचा शिक्का गडद होतो. अजमल यांचा जगातल्या 500 प्रभावी मुस्लिमांमध्ये नेहमी समावेश होतो.

बद्रुद्दीन अजमल यांनी प्रचारात बोलताना वक्तव्य केले होते की, कॉँग्रेस आणि एआययूडीएफ सत्तेत आली तर सारा भारत इस्लाम देश होईल. एकही हिंदू भारतात राहणार नाही, सर्वांना धर्मांतर करावं लागेल.

मोगलांनी या देशावर 800 वर्षे राज्य केले, हा देश इस्लामीच होता असेही त्यांनी म्हटले होते. भाजप सत्तेत आली तर ते मुस्लिम महिलांना बुरखा घालू देणार नाहीत, पुरुषांना दाढी वाढवू देणार नाहीत, मुस्लिमांना त्यांची टोपी घालू देणार नाहीत, इतकंच काय मशिदीतल्या अजानवरही ते बंदी आणतील, असेही त्यांनी म्हटले होते.

या पक्षाशी आघाडी करू नये, याचा आपल्याला तोटाच होईल, अशी भूमिका कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते मांडत होते. आनंद शर्मा यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने जातीयवादी पक्षाशी जवळीक केल्याचा आरोप केला होता.

140 पैकी 86 जागा काँग्रेसने लढविल्या आणि 21 जागा बद्रुद्दीन अजमल यांच्या पक्षाने लढविल्या. अपेक्षेप्रमाणे मुस्लिम बहुल भागातील जागा एआययूडीएफने लढविल्या होत्या. याठिकाणी मुस्लिम मतांनी त्यांना साथ दिली. त्यामुळे १६ जागांवर एआययूडीएफला विजय मिळविला.

मात्र, कॉंग्रेसला शंभरहून अधिक जागांवर एआययूडीएफ आणि अजमल यांच्या प्रतिमेचा तोटा झाला. हिंदूंनी कॉँग्रेसला मते दिली नाहीत. त्यामुळे कॉँग्रेसचा दारुण पराभव झाला. एकेकाळी राज्यातील सत्ताधारी पक्ष असलेल्या कॉँग्रेसला केवळ २९ जागा मिळविता आल्या.

In Assam, this man’s support cost the Congress dearly

महत्त्वाच्या बातम्या