कोरोनाच्या भारतीय अवताराचा जगालाही मोठा धोका, आरोग्य संघटनेचा पुन्हा इशारा


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतात आढळलेला कोरोना विषाणूंचा नवा अवतार (व्हेरीयंट) विलक्षण वेगाने संक्रमित होणारा व पहिल्या विषाणूपेक्षा जास्त घातक ठरू शकतोWHO gave warning to world regarding corona virant

असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. B.१.६१७ प्रकारचा हा विषाणू कदाचित कोरोना लशींनाही जुमानणार नाही अशीही भीती, डब्ल्यूएचओ ने व्यक्त केली आहे.



भारतात आढळलेल्या या नव्या विषाणूंची मारक क्षमता ही स्वतःमध्ये विकसित केल्याची अशा शंका बोलून दाखवली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले, की हा

नवा विषाणू संपूर्ण जगासाठी आगामी काळात चिंतेचा विषय ठरू शकतो. त्यामुळे संपूर्ण जगाला त्या विषाणूबद्दल सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. हा विषाणू तुलनेने कित्येक पटीने जास्त संक्रमक आहे.

गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये विदर्भाच्या काही भागात हा विषाणू सर्वप्रथम आढळला होता. त्यानंतर भारतीय वैद्यक तज्ञांनी याबाबत वारंवार इशारा दिला होता. आता या विषाणूने संक्रमणाची त्याची पातळी वाढवली आहे, असाही इशारा देण्यात आला आहे.

WHO gave warning to world regarding corona virant

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात