शेतकरी कायदे रद्द झाल्यानंतर भारताचे माजी कृषिमंत्री शरद पवार काय म्हणाले???


विशेष प्रतिनिधी

चंद्रपूर : गुरुनानक जयंतीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी तिन्ही शेतकरी कायदे मागे घेण्यात आले आहेत असे जाहीर केले आहे. या त्यांच्या निर्णयावर देशात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधी पक्षनेते या निर्णयाबाबत खुश आहेत तर भाजप नेते याबाबत खेद व्यक्त करत आहेत.

What former Agriculture Minister of India Sharad Pawar has to say after repeal of Farmers Act???

चंद्रपूर येथील सभेमध्ये शरद पवार यांना याबाबत त्यांची प्रतिक्रिया विचारली असताना शरद पवार यांनी सांगितले की, कृषी कायद्यांवर खूप दिवसांपासून चर्चा सुरू होती. कृषी क्षेत्रात बदल करावेत, गुंतवणुकीला वाव मिळावा, शेतमालाला जागतिक बाजारपेठ मिळावी, पिकाला उत्तम किंमत मिळावी या सर्व विचारांवर केंद्र सरकारमध्ये चर्चा सुरू होती. मी स्वतः देशाचा कृषिमंत्री होतो त्यावेळी माझ्याशी चर्चा झाल्या होत्या. कायद्यात बदल करण्याबद्दलही चर्चा करण्यात आली होती.

आपल्या घटनेने शेती हा विषय राज्यांकडे दिलाय तेव्हा या सर्व विषयांवरील चर्चा दिल्लीमध्ये बसून न घेता राज्य सरकारला विश्वासात घेऊन, राज्याचे प्रतिनिधी, विविध कृषी विद्यापीठे, शेतकर्यांच्या संघटना या सर्वाना सहभागी करून घेतले जावे या विचारांचा मी होतो. पण मोदी सरकारने या विचाराला अक्षरशः हा नकार दिला आणि काही तासांच्या आतच दिल्लीमध्ये तिन्ही कायदे मंजूर करण्यात आले. त्यामुळेच या कायद्याला नंतर बऱ्याच स्तरातून विरोधाचा सामना करावा लागला.

देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच शेतकरी एक वर्षभर ऊन, पाऊस, वारा यांचा विचारणा न करता दिल्ली सीमारेषेवर आंदोलनाला बसले होते. सुरुवातीला शेतकर्यांची मागणी मान्यही करणार नाही अशी भूमिका मोदी सरकारने घेतली होती. पण शेतकर्यांनी दाखवलेल्या संयमाचे मी कौतुक करतो असे ते म्हणाले.


Farmers Protest: दिल्लीच्या सीमेवरून बॅरिकेड्स हटवले, टिकरी सीमेवर 40 फुटी रस्ता खुला झाल्याने नाराज शेतकरी रोडवरच बसले


या सर्व गोष्टींमध्ये एक गोष्ट चांगली झाली ती म्हणजे, उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, हरयाणा इत्यादी भागातील शेतकरी एकत्रपणे ताकदीने सरकारविरोधी निर्णयाविरुद्ध उभे राहिले.

त्याचप्रमाणे भाजप सरकारला टोला लगावताना शरद पवार म्हणाले की, पंजाब आणि उत्तर प्रदेश या ठिकाणच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. या निवडणुकांमध्ये भाजपचे कार्यकर्ते जेव्हा प्रचार करण्यास जातील तेव्हा जनता त्यांना प्रश्न विचारेल. आणि त्यांना त्याची किंमत चुकवावी लागेल. हे जेव्हा मोदी सरकारच्या लक्षात आले, तेव्हा त्यांनी हे कायदे रद्द करण्याचे ठरवले आहे.

उशिरा का होईना पण सरकारला शहाणपण आल्याबद्दल मी दु:ख व्यक्त करणार नाही. शांततेच्या मार्गाने केलेल्या संघर्ष याबद्दल त्यांनी शेतकर्यांचे कौतुकही केले आणि अभिनंदनही केले.

What former Agriculture Minister of India Sharad Pawar has to say after repeal of Farmers Act???

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात