देशभरातील लहान मुलांच्या लसीकरणाबात लवकरच निर्णय


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – देशभरातील लहान मुलांचे लसीकरण आणि पहिली कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्यांना आणखी दुसरी लस देण्याबाबत येत्या दोन आठवड्यांत सरकारी पातळीवरून निर्णय होणे अपेक्षित आहे.Vaccination for children very soon

भारत सरकारचा लसीकरणाशी संबंधित राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समूहाची पुढील दोन आठवड्यांमध्ये बैठक होऊ शकते. यामध्ये प्रौढांना अतिरिक्त डोस देण्याबाबत देखील सर्वसमावेशक आराखडा आखला जाऊ शकतो. सहव्याधी असणाऱ्या लहान मुलांचे जानेवारी महिन्यापासून लसीकरण सुरू होऊ शकते.



येत्या मार्चपर्यंत सर्वच पात्र मुलांना लस देण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. कोरोना संसर्गापासून आणखी संरक्षण मिळावे म्हणून अनेकांनी बूस्टरचा आग्रह धरला असून त्याबाबत देखील केंद्रीय पातळीवर चर्चा सुरू आहे.

सध्या लहान मुलांमधील लसीकरणावर केंद्र सरकारने लक्ष केंद्रित केले असून अनेक राज्यांनी संसर्गाची स्थिती लक्षात घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल असे म्हटले आहे.कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर बूस्टर डोस द्यावा की नाही?

हे अद्याप वैद्यकशास्त्राच्या कसोटीवर स्पष्ट झालेले नाही. तसे वैज्ञानिक पुरावे देखील समोर आलेले नाहीत. भारतच नाहीतर जगातील बहुसंख्य देश हे दुसऱ्या लसीलाच प्राधान्य देत असल्याचे दिसून आले आहे.

Vaccination for children very soon

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”