हंगामी पोलीस महासंचालक लोकसेवा आयोगाच्या महासंचालक पदाच्या यादीत नाहीत, हेमंत नगराळे, डॉ. के. वेंकटेशम, रजनीश सेठ शर्यतीत


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यातील ठाकरे सरकारने हंगामी पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती केलेल्या संजय पांडे यांचे नाव लोकसेवा आयोगाने महासंचालक पदासाठी केलेल्या शिफारसीच्या यादीतून वगळले आहे. सध्या महासंचालक पदासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख रजनीश सेठ, गृहरक्षक दलाचे महासंचालक डॉ. के. वेंकटेशम आणि मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे या तीन अधिकाऱ्यांच्या नावांची शिफारस करण्यात आली आहे.Acting Director General of Police is not in the list of Director General of Public Service Commission, Hemant Nagarale, Dr. K. Venkatesh, Rajneesh Seth in the race

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्यानुसार लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या नावांपैकीच एका अधिकाऱ्याची निवड करणे बंधनकारक आहे. त्यामुळे संजय पांडे यांचे पद वाचणार की नाही हा प्रश्न आहे. ते जून २०२२ मध्ये निवृत्त होणार आहेत. मात्र, कदाचित त्याअगोदरच त्यांना महासंचालक पदावरून पायउतार व्हावे लागेल.



राज्य शासनाने १२ सेवाज्येष्ठ अधिकाऱ्यांची यादी केंद्रीय लोकसेवा आयोगाला पाठविली होती. गेले काही महिने यावर निर्णय झाला नव्हता. अखेर लोकसेवा आयोगाच्या १ नोव्हेंबरला झालेल्या बैठकीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख रजनीश सेठ, गृहरक्षक दलाचे महासंचालक डॉ. के. वेंकटेशम आणि मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे या तीन अधिकाऱ्यांच्या नावांची शिफारस करण्यात आली आहे.

लोकसेवा आयोगाच्या शिफारशीनुसार या तीन अधिकाऱ्यांपैकी एकाची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी निवड करावी लागणार आहे.मात्र, काही सनदी अधिकाऱ्यांनी लोकसेवा आयोगाने केलेल्या शिफारशी प्रत्यक्षात आणणे बंधनकारक नसल्याची भूमिका घेतली आहे.

काही राज्यांनी लोकसेवा आयोगाचा सल्ला न घेता महासंचालकांची निवड केली. अनेक राज्यांनी आयोगाच्या शिफारशी धुडकावून लावल्या आहेत. यासंदभार्तील अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच घेतील, असे गृह विभागाने स्पष्ट केले आहे. एप्रिल महिन्यापासून पांडे यांच्यावर पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे.

Acting Director General of Police is not in the list of Director General of Public Service Commission, Hemant Nagarale, Dr. K. Venkatesh, Rajneesh Seth in the race

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात