ममता बॅनर्जी यांची राजकीय पावले; छोटा पॅकेट बडा धमाका!!


पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दुसऱ्यांदा दिल्लीत आल्या आहेत. त्यांनी नेहमीप्रमाणे भाजपवर तोंडी फैरी झाडत आजही काँग्रेस फोडली आहे. दिल्ली आणि हरियाणातल्या नेत्यांना त्यांनी तृणमूल काँग्रेस मध्ये प्रवेश दिला आहे. भाजपचे माजी खासदार आणि सध्या काँग्रेसचे नेते होते ते कीर्ती आझाद आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय नेते अशोक तंवर यांना त्यांनी तृणमूल काँग्रेस मध्ये घेतले आहे.Mamata Banerjee’s national politics; starts from small states, but with consolidated steps

या दोन्ही नेत्यांना प्रवेश देताना ममता बॅनर्जी यांनी एक सूचक विधान केले आहे. अशोक तंवर यांनी मला बोलावले की मी हरियाणाचा दौरा करणार आहे, असे त्या म्हणाल्या. ममतांच्या या छोट्या वक्तव्यातच बडा राजकीय धमाका दडलेला आहे…!!



ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर गेल्या साधारण सहा महिन्यांत टाकलेल्या राजकीय पावलांचा आढावा घेतला तर काय लक्षात येते…?? ममता बॅनर्जी यांनी छोट्या राज्यांना आपले राजकीय टार्गेट केलेले दिसते. आसाम, त्रिपुरा, मणिपूर, गोवा, दिल्ली आणि आता हरियाणा या छोट्या राज्यांमार्गे त्या दिल्लीच्या राजकारणात आपला जम बसवू इच्छितात असे दिसते. आसाम मधून त्यांनी सुष्मिता देव यांना फोडले.

त्रिपुरात स्वतः खासदार अभिषेक बॅनर्जी हे लक्ष घालून तिथले मुख्यमंत्री विप्लव कुमार देव यांची राजवट घालवण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून आहेत. गोव्यात त्यांनी लुईजिनो फालेरो यांना फोडले. दिल्लीत कीर्ती आझाद यांना फोडले आणि हरयाणात अशोक तंवर यांना फोडले. छोट्या राज्यांमधल्या काँग्रेसचे हे राजकीय क्षरण आहे. हे फक्त काँग्रेसचे नेते खासदार अधीर रंजन चौधरी यांनी ओळखले आहे. बाकीचे काँग्रेस नेते ममता बॅनर्जी यांच्या या “काँग्रेस फोडू” राजकारणावर बोलतच नाहीत.

ममता बॅनर्जी यांच्या या राजकारणाचा अर्थ असा की छोट्या राज्यांमधून त्या आपले राजकीय महत्त्व सिद्ध करू इच्छितात. एक प्रकारे राजकीयदृष्ट्या हे योग्यही आहे. कोणत्याही मोठ्या राज्यांमध्ये जाऊन फारतर राजकीय हवा तयार करता येते. पण तिथल्या प्रस्थापित राजकीय पक्षांना खऱ्या अर्थाने आव्हान देता येत नाही. त्यामुळे दिल्लीतले खरे राजकारण साध्य करायचे असेल तर छोट्या राज्यांमधून विशिष्ट संख्याबळ घेऊन गेले तर ते अधिक परिणामकारक ठरू शकते, असा ममता बॅनर्जी यांचा राजकीय होरा आहे.

ममता बॅनर्जी या राजकीय वाटचाल करत असलेल्या राज्यांचा आढावा घेतला तर पश्चिम बंगाल लोकसभेच्या 42 जागा, आसाम 21 जागा, बाकी छोट्या राज्यांमध्ये दहाच्या आसपास जागा आहेत. याचा अर्थ ममता बॅनर्जी यांना सुरुवातीला आपले राजकीय टार्गेट तृणमूल काँग्रेसच्या 50 ते 75 जागांचे ठेवायचे आहे. तेवढे जरी टार्गेट ठेवले तरी त्यांच्या राष्ट्रीय राजकारणासाठी पोषक वातावरण निर्मिती होऊ शकते. अशा स्थितीत काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षाला त्या “रिप्लेस” करून स्वतःची तृणमूल काँग्रेस मजबूत करू शकतात. इतकेच नाही तर बाकीच्या राज्यांमध्ये फारसा हस्तक्षेप न करता तिथल्या राज्यांमधल्या प्रबळ पक्षांना आपल्या समवेत घेऊ शकतात.

अरविंद दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि ममता बॅनर्जी यांच्या राजकारणातला हा फरक आहे. ममता बॅनर्जी या अजून उत्तर प्रदेशात गेल्या नाहीत. पंजाब मध्ये गेल्या नाहीत. तिथे प्रबळ पक्षांची टक्कर घेण्यापेक्षा आपली शक्ती छोट्या राज्यांवर केंद्रित केली तर केजरीवाल यांच्यासारख्या संभाव्य राजकीय पोटेन्शिअल असणाऱ्या नेत्यावर देखील त्यांना मात करता येऊ शकेल.

कारण केजरीवाल जरी उत्तर प्रदेश, उत्तराखंड पंजाब या राज्यांवर लक्ष केंद्रित करत असले तरी पंजाब सोडून बाकीच्या राज्यांमध्ये त्यांना फारसे कोणी हिंग लावून विचारेल, अशी स्थिती नाही. त्यामुळे केजरीवाल फारतर उत्तर प्रदेश उत्तराखंड मध्ये वातावरण निर्मिती करू शकतात. पण त्यांना ममता बॅनर्जी यांच्या एवढे राजकीय यश मिळण्याची शक्यता कमी आहे. आणि इथेच ममता बॅनर्जी यांची छोटी राजकीय पावले महत्त्वाची ठरतात.

छोट्या राज्यांमधून विशिष्ट संख्याबळ घेऊन दिल्लीत राजकारण केल्यावर आपल्या राज्यावरची पकड अधिक घट्ट होतेच, शिवाय दिल्लीत निर्णायक महत्त्व प्राप्त होते याची पक्की जाणीव ममतांना आहे. त्यामुळेच छोट्या राज्यांवर लक्ष केंद्रित करून त्या आपले राजकारण 2024 पर्यंत पुढे सरकवताना दिसत आहेत.

उगाच कोणत्या जिल्हा बँकांच्या निवडणुकीत कोणाला निवडून आणण्यासाठी त्या फोन बिन करून प्रयत्न करताना दिसत नाहीत आणि पराभव झाला म्हणून त्या गावात जाऊन झाडाझडती घेत बसत नाहीत. तर त्या खऱ्या अर्थाने राष्ट्रीय राजकारणात जम बसवण्यासाठी आपली छोटी पण दमदार पावले टाकताना दिसत आहेत…!!

Mamata Banerjee’s national politics; starts from small states, but with consolidated steps

महत्त्वाच्या बातम्या

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात