बंगाली अभिनेत्र्यांना राजकारणाचा लळा, ममता बॅनर्जींच्या गळ्यात गळा, २२ वर्षांची सायोनी घोषने मुख्यमंत्र्यांच्या सभेत घातला गोंधळ


विशेष प्रतिनिधी

कोलकत्ता : नुसरत जहा, मिमी चक्रवर्तीपासून बंगाली अभिनेत्र्यांना राजकारणाचा लळा लागला आहे. विशेष म्हणजे प्रामुख्याने तृणमूल कॉँग्रेसमध्ये प्रवेश करणाºया अभिनेत्रींची संख्या जास्त आहे. त्रिपुरामध्ये अटक करण्यात आलेली सायोनी घोष ही केवळ २२ वर्षांची अभिनेत्री तृणमूलचा चेहरा बनत आहे.Bengali actresses int politics, 22-year-old Sayoni Ghosh campaigning in Tripura

बंगाली मालिका तसेच चित्रपटात काम केलेल्या सायोनी घोषला नुकतीच त्रिपुरा पोलीसांनी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक झाली. मुख्यमंत्री बिप्लब देव यांच्या सभेतही खेला होबेच्या घोषणा देत गोंधळ घातला होता.सायोनी घोष हिला ममता बॅनर्जी यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आसनसोलमधून उमेदवारी दिली होती. यावेळी सायोनीने आसनसोलमध्ये भाड्याने घर घेतले होते. दररोज सकाळी सात वाजल्यापासून ती प्रचार करत होती.

मात्र, भाजपाचे पॉल अग्निमित्र यांच्याकडू पाच हजार मतांनी पराभव पत्करावा लागला. मात्र ममता बॅनर्जी यांनी सायोनीला स्ट्रिटफायटर संबोधले होते. त्यामुळे त्यानंतर तृणमूल कॉँग्रेसने सायोनीला युवक अध्यक्षपद दिले. आता सायोनीकडे त्रिपुराची जबाबदारी देण्यात आली आहे.

Bengali actresses int politics, 22-year-old Sayoni Ghosh campaigning in Tripura

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”