विशेष प्रतिनिधी
लखनौ : मजलिस-ए-इत्तेहादूलचे (एमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपला आव्हान दिले असेल तर भाजप कार्यकर्ते ते स्वीकारतील, असे प्रत्यूत्तर देत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप तीनशेपेक्षा जास्त जागा मिळवेल असा विश्वास व्यक्त केला. UP now see political battle between Owesi and Yogi
दरम्यान, ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाची उत्तर प्रदेशात शंभर जागा लढविण्याची योजना आहे. ओमप्रकाश राजभर यांच्या सुहेलदेव भारतीय समाज पक्षासह (एसबीएसपी) त्यांनी युती केली आहे. एसबीएसपीने इतर छोट्या नऊ पक्षांसह युती केली असून त्यास भागीदारी संकल्प मोर्चा असे संबोधले आहे. सर्व जागा लढविण्याची या युतीचा निर्धार आहे.
योगी आदित्यनाथ यांना पुन्हा मुख्यमंत्री होऊ देणार नाही, असे ओवेसी यांनी शनिवारी सांगितले होते. त्याबाबत आदित्यनाथ म्हणाले की, ओवेसीजी एक मोठे राष्ट्रीय नेते आहेत. ते प्रचारासाठी देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जात असतात. जनतेमध्ये त्यांची स्वतःची अशी विश्वासार्हता आहे. त्यांनी आव्हान दिले असेल तर आमचे कार्यकर्ते ते स्वीकारतील.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App