भारताच्या तंबीनंतर ब्रिटिशांचे डोके ठिकाण्यावर, कोव्हिशील्डला स्वीकृत लसीची मान्यता, हजारो प्रवाशांना दिलासा

united kingdom uk changes travel advisory accepts covishield as approved vaccine

covishield : युनायटेड किंगडम (यूके) ने कोव्हिशील्डला मान्यताप्राप्त लस म्हणून समाविष्ट करण्यासाठी आपल्या प्रवासी धोरणात सुधारणा केली आहे. भारताकडून तीव्र आक्षेप नोंदवत जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिल्यानंतर ब्रिटनने हा निर्णय घेतला आहे. तथापि, असे सांगण्यात येत आहे की, ज्या भारतीयांनी भारतात लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांना अद्यापही विलगीकरणात राहावे लागेल. united kingdom uk changes travel advisory accepts covishield as approved vaccine


विशेष प्रतिनिधी

लंडन : युनायटेड किंगडम (यूके) ने कोव्हिशील्डला मान्यताप्राप्त लस म्हणून समाविष्ट करण्यासाठी आपल्या प्रवासी धोरणात सुधारणा केली आहे. भारताकडून तीव्र आक्षेप नोंदवत जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिल्यानंतर ब्रिटनने हा निर्णय घेतला आहे. तथापि, असे सांगण्यात येत आहे की, ज्या भारतीयांनी भारतात लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांना अद्यापही विलगीकरणात राहावे लागेल.

यूकेने आपल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे की, ‘अॅस्ट्राझेनेका कोव्हिशील्ड, अॅस्ट्राझेनेका व्हॅक्सजेव्हरिया आणि मॉडर्न टेकेडा या चार सूचीबद्ध लस फॉर्म्युलेशन्स मंजूर लस म्हणून पात्र आहेत.’ तथापि, कोव्हिशील्डचे दोन डोस घेतल्यानंतरही भारतीयांना विलगीकरणात ठेवण्यात येईल. यूके उच्चायुक्तांद्वारे यापूर्वी असे सांगण्यात आले की, यूके सरकार लसीकरण प्रमाणपत्राची मान्यता वाढवण्यासाठी भारतासोबत काम करत आहे.

भारत आता अंबर यादीत आहे, परंतु लसीकरणानंतरही येथील नागरिकांना विलग ठेवण्यात येत आहे. यूकेने कोव्हिशील्ड न स्वीकारण्यामागे जे कारण समोर आले आहे ते अतिशय चिंताजनक आहे. यूकेचे म्हणणे आहे की, ही समस्या कोविशील्डची नाही, तर भारतात लसीकरण प्रमाणपत्राची समस्या आहे.

united kingdom uk changes travel advisory accepts covishield as approved vaccine

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात