राज्यात अत्याचार थांबेनात : पुण्यात विवाहितेची सामूहिक बलात्कारानंतर हत्या, एका आरोपीला अटक, इतरांचा शोध सुरू


Pune : आणखी एका बलात्काराच्या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मागच्या काही दिवसांपासून राज्यभरात महिलांविरुद्ध अत्याचारांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. एका विवाहितेची रविवारी सामूहिक बलात्कारानंतर हत्या करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी ही माहिती दिली आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पीडितेच्या चुलत दिरानेच मित्राच्या मदतीने अत्याचारानंतर चेहरा दगडाने ठेचून हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. Murder after gangrape with woman in Pune husband’s relatives and friends accused


वृत्तसंस्था

पुणे : आणखी एका बलात्काराच्या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मागच्या काही दिवसांपासून राज्यभरात महिलांविरुद्ध अत्याचारांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. एका विवाहितेची रविवारी सामूहिक बलात्कारानंतर हत्या करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी ही माहिती दिली आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पीडितेच्या चुलत दिरानेच मित्राच्या मदतीने अत्याचारानंतर चेहरा दगडाने ठेचून हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पुणे जिल्ह्यातील मौजे सोमाटणे गावातील ही घटना आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 वर्षीय महिलेवर तिच्या चुलत दिराने आणि त्याच्या मित्राने सामूहिक बलात्कार केला. यानंतर महिलेची हत्या करण्यात आली. ही घटना एका मंदिराजवळ घडली. आरोपीने पीडितेला मंदिर दाखवण्याच्या बहाण्याने सोबत नेले. तेथे मंदिराजवळील जंगलात दोघांनी महिलेवर बलात्कार केला. यानंतर त्यांनी तिची गळा दाबून हत्या केली. ओळखू येऊ नये म्हणून चेहरा दगडाने ठेचण्यात आला होता.

गुन्हा दाखल, एका आरोपीला अटक

याप्रकरणी सोमवारी पिंपरी चिंचवडच्या तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचवेळी मृत महिलेच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. यासह आरोपी नातेवाइकालाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून केलेल्या चौकशीत, इतरही सामूहिक बलात्कारात सामील असल्याचे आढळले आहे. उर्वरित आरोपींच्या शोधात पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.

Murder after gangrape with woman in Pune husband’s relatives and friends accused

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात