पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेच्या दौऱ्यात विविध विषयांवर चर्चा; कोरोना वैश्विक शिखर संमेलनातही भाग घेणार


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून अमेरिकेचा दौऱ्यावर आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची ते भेट घेणार असून विविध मुद्यावर ते त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. Prime Minister narendra Modi to visit US from today, discuss a number of issues with joe bidden

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा गेल्या दोन वर्षातील पहिलाच परदेश दौरा आहे. जो बायडेन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतरचा मोदी यांचा हा पहिलाच दौरा आहे. दोन्ही नेत्यांनी तीन वेळा ऑनलाइन चर्चा केली आहे. मात्र, पहिल्यांदाच त्यांची सामोरा समोर भेट होत आहे. या भेटीत अफगाणिस्तान व तालिबान या विषयावर प्रामुख्याने चर्चा होईल.



अमेरिकेत गेल्यानंतर पंतप्रधान मोदी वॉशिंग्टन डीसी आणि न्यूयॉर्कला भेटी देणार आहेत. परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी सांगितलं की, मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी आयोजित केलेल्या कोरोना वैश्विक शिखर संमेलनात सहभागी होतील. मोदी आणि बायडन यांच्यात २४ रोजी द्विपक्षीय बैठक होईल. यात पंतप्रधान मोदी आणि बायडन भारत-अमेरिकेतील संबंधांवर चर्चा करतील. तसेच या बैठकीत व्यापार आणि गुंतवणूक संबंध मजबूत करणे, सुरक्षेसंबंधी तसेच स्वच्छ ऊर्जा भागिदारीला प्रोत्साहनावर चर्चा होऊ शकते. पंतप्रधान मोदी यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजीत डोभाल आणि विदेश सचिव श्रृंगला आहेत.

Prime Minister narendra Modi to visit US from today, discuss a number of issues with joe bidden

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात