एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या दिल्लीतील बंगल्याची तोडफोड, पोलिसांनी 5 जणांना घेतले ताब्यात

Destruction at AIMIM Chief Asaduddin Owaisi Delhi House, 5 people detained

Asaduddin Owaisi Delhi House : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या दिल्लीतील 24- अशोका रोडवरील बंगल्याच्या गेटची तोडफोड करण्यात आली आहे. येथे नेमप्लेट-ट्यूबलाइट फोडून टाकण्यात आली आहे. नवी दिल्लीचे डीसीपी म्हणाले, याप्रकरणी 5 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. Destruction at AIMIM Chief Asaduddin Owaisi Delhi House, 5 people detained


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या दिल्लीतील 24- अशोका रोडवरील बंगल्याच्या गेटची तोडफोड करण्यात आली आहे. येथे नेमप्लेट-ट्यूबलाइट फोडून टाकण्यात आली आहे. नवी दिल्लीचे डीसीपी म्हणाले, याप्रकरणी 5 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

डीसीपी (नवी दिल्ली) दीपक यादव यांनी सांगितले की, आम्ही घटनास्थळावरून 5 जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांनी प्राथमिक चौकशीत दावा केला की, ते त्यांच्या वक्तव्यांमुळे चिडलेले होते. डीसीपी म्हणाले की, आम्ही त्यांची चौकशी करत आहोत. काही लोक ओवैसी यांच्या दिल्ली निवासस्थानाची तोडफोड करत असल्याचा पीसीआर कॉल आल्यावर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली.

पोलिस येईपर्यंत तोडफोड झालेली होती

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि सर्व आरोपींना घटनास्थळावरून ताब्यात घेतले. पोलिस कर्मचारी येईपर्यंत त्यांनी असदुद्दीन ओवैसी यांच्या घराचे मुख्य गेट आणि खिडक्यांचे नुकसान केले होते. त्यानंतर 5 जणांना घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले.

Destruction at AIMIM Chief Asaduddin Owaisi Delhi House, 5 people detained

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण